Asia cup 2023: वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह अष्टपैलू हार्दिक पांड्या हे आगामी आशिया चषक आणि ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी, भारतीय संघाचा उपकर्णधार होण्यासाठी फेव्हरेट मानले जात आहेत. पांड्याला सध्यातरी नियमित टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. मात्र, हे बीसीसीआयकडून अधिकृत स्पष्ट करण्यात आलेले नाही. दुसरीकडे, बुमराहला आयर्लंड विरुद्ध शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत कर्णधारपद देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात रोहित शर्माचा उत्तराधिकारी कोण होणार? असे प्रश्न क्रिकेट वर्तुळात चर्चिले जात आहेत.
पीटीआयच्या वृत्तानुसार, भारत विरुद्ध आयर्लंड मालिकेतून परतलेल्या जसप्रीत बुमराहला आशिया चषक आणि विश्वचषक संघातही उपकर्णधारपद मिळू शकते. बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “ज्येष्ठतेनुसार आपण विचार केल्यास बुमराह पांड्यापेक्षा पुढे आहे कारण, त्याने २०२२ मध्ये कसोटी संघाचे नेतृत्व केले होते. दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय दौऱ्यात पांड्यापूर्वी तो ‘वन डे’चाही उपकर्णधारही होता. तो पुढे म्हणाला, “जर बुमराहला आशिया चषक आणि विश्वचषक या दोन्हीसाठी वन डेमध्ये उपकर्णधार बनवले तर आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळेच त्याला ऋतुराजऐवजी आयर्लंडमध्ये बुमराहकडे कर्णधारपद देण्यात आले.”
रोहित शर्मानंतर हार्दिक पांड्या मर्यादित षटकांमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणार असल्याचे आधी सांगितले जात होते, मात्र आता जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाने मोठा ट्वीस्ट आला आहे. अशा परिस्थितीत बुमराहला आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी वन डे संघाचा उपकर्णधार बनवले जाऊ शकते. रोहित शर्मानंतर बुमराहला वन डे आणि कसोटी फॉर्मेटमध्ये ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
माहितीसाठी की, टीम इंडिया कर्णधारपदाचा प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ नाही. हार्दिक आणि बुमराहच्या आधी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडेही भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते, मात्र दुखापतीमुळे पंत टीम इंडियातून बाहेर आहे. अशा परिस्थितीत आता बुमराह आणि पांड्या यांच्यात कर्णधारपद मिळवण्यासाठीची रस्सीखेच रंजक ठरू शकते.
हेही वाचा: U-19 World Cup: अमेरिकेची ऐतिहासिक कामगिरी! अंडर-१९ विश्वचषकासाठी पहिल्यांदाच ठरली पात्र
अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल संघ गुजरात टायटन्सने बऱ्यापैकी यश मिळवले आहे. पण पांड्याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजमध्ये भारतीय संघाला द्विपक्षीय टी२० मालिकेत मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर हार्दिकवर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती. भारतासाठी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. पांड्याने देशासाठी एकूण ९२ टी२० सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याला ८१ डावांत २६.७१च्या सरासरीने ७३ यश मिळाले आहे.