KL Rahul on Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेसाठी श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या फिटनेसबाबत अपडेट दिले आहे. मुख्य प्रशिक्षकाने मंगळवारी (२९ ऑगस्ट) सांगितले की, के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या फिटनेसवर खूश आहे. सराव शिबिरात दोन्ही खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली. आशिया चषकाच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये राहुल खेळणार नसल्याची माहितीही द्रविडने दिली. त्यानंतर त्याचे संघात पुनरागमन अपेक्षित आहे. याबाबत बीसीसीआयने अधिकृत ट्वीट करून माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल द्रविड म्हणाला, “के.एल. राहुलने चांगली फलंदाजी केली आहे. तो यष्टिरक्षणही करत आहे. विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून त्याला दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात येणार आहे. त्यानंतर तो पुनरागमन करेल. या मालिकेत तो दोन सामने खेळेल अशी आम्हाला आशा आहे. आम्हाला त्याची फारशी चिंता नाही, खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.”

आशिया चषक स्पर्धेत खेळणार का अय्यर?

द्रविड पुढे म्हणाला, “क्रमांक चार आणि पाच क्रमांकावर कोण खेळणार? याची बरीच चर्चा झाली आहे. गेल्या १८ महिन्यांपासून या जागेसाठी तीन खेळाडू होते. श्रेयस अय्यर, के.एल. राहुल आणि ऋषभ पंत. दोन महिन्यांत तिन्ही खेळाडू जखमी होणे दुर्दैवी होते. त्यामुळे प्रयोग करत राहावे लागले. तिघांवरही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या खेळाडूंना आजमावून पाहिले. हे सर्व सोडून विश्वचषकासाठी आम्हाला तयार राहावे लागले. विश्वचषकात काय होणार आहे हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आम्ही क्रमवारीत दोन-तीन खेळाडूंना सतत संधी दिली. जेव्हा तुमच्याकडे प्रमुख खेळाडू नसतात तेव्हा तुम्हाला इतरांना संधी द्यावी लागते.”

हेही वाचा: National Sports Day: तीन खेळाडूंनी स्पोर्ट्स डे केला खास; आठवडाभरात देशाला सुवर्ण, रौप्य अन् कांस्यपदक मिळाले

संघात खूप कर्णधार असल्याबद्दल द्रविड काय म्हणाला?

मुख्य प्रशिक्षक म्हणाले, “आमच्या संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. यापूर्वी काही खेळाडू कर्णधार राहिले आहेत. काहींनी अलीकडच्या काळात कर्णधारपद भूषवले आहे. आजच्या काळात अधिक क्रिकेट घडत आहे. हे लक्षात घेऊन आम्ही फिरत आहोत. गटातील प्रत्येकाला अनुभव असेल तर चांगले आहे. अंतिम निर्णय फक्त रोहित शर्माचा आहे.”

आशिया चषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा करतानाही, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी लोकेश राहुल बद्दल स्पष्ट केले होते की, तो तंदुरुस्त आहे पण तरीही त्याच्या काही समस्या आहेत ज्यामुळे त्याला सुरुवातीच्या सामन्यांपासून दूर ठेवावे लागेल. त्याचवेळी एनसीएमध्ये सराव पूर्ण केल्यानंतर श्रेयस अय्यरचाही संघात समावेश करण्यात आला आहे. फिटनेसचे निकष पूर्ण केल्यानंतर त्याची संघात खेळण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा: Rishabh Pant: टीम इंडियाचे सराव शिबीर सुरु असताना ऋषभ पंतची सरप्राईज भेट, रोहित-कोहलीशी केली चर्चा; Video व्हायरल

घरच्या मैदानावर विश्वचषकाचे दडपण किती?

मुख्य प्रशिक्षक म्हणाले, “मायदेशात घरच्या मैदानावर विश्वचषक खेळणे ही भारतासाठी खूप मोठी अभिमानाची बाब आहे. प्रेक्षकांचा दबाव असेल. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र, आम्ही पूर्ण तयारी केली आहे.” भारताचा विश्वचषकातील पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्याआधी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ५ ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होईल. अंतिम सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबाद येथे होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup kl rahul out of matches against pakistan and nepal know when will return avw
Show comments