कर्णधार अँजेलो मॅथ्यूजच्या संयमी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेच्या शेवटच्या साखळी लढतीत बांगलादेशवर ३ विकेट्सनी रडतखडत विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेने चारही साखळी लढतीत अपराजित राहण्याची किमयाही केली. आता शनिवारी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला श्रीलंकेच्या शिस्तबद्ध आक्रमणामुळे केवळ २०४ धावांचीच मजल मारता आली. या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची ३ बाद ८ अशी अवस्था झाली. लहिरू थिरिमाने आणि अशान प्रियंजन यांनी चौथ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी करत डाव सावरला. मात्र त्यानंतर दोघेही झटपट तंबूत परतल्याने श्रीलंकेचा संघ अडचणीत सापडला. मॅथ्यूजने चतुरंग डिसिल्व्हाच्या साथीने सहाव्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. मॅथ्यूजने नाबाद ७४ धावांची खेळी करत श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा