वृत्तसंस्था, कोलंबो : IND vs PAK Updates Asia Cup 2023 भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यातील लढतीची पर्वणी पुन्हा चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. हे दोन संघ आज, रविवारी  आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘सुपर फोर’ फेरीत आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून केएल राहुल आणि इशान किशन यांच्यापैकी कोणाला पसंती द्यायची हा भारतीय संघ व्यवस्थापनापुढील मोठा प्रश्न आहे. पावसामुळे रविवारी सामना पूर्ण होऊ न शकल्यास उर्वरित सामना सोमवारी खेळवला जाऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाला आता महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक असल्याने सर्व संघ या स्पर्धेच्या दृष्टीनेच विचार करत आहेत. भारताचाही विश्वचषकापूर्वी आपला सर्वोत्तम ११ जणांचा संघ निश्चित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, दुखापतींचा भारताच्या योजनांना फटका बसला आहे. आशिया चषकाला सुरुवात होण्यापूर्वी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी राहुलला पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून संबोधले होते. परंतु, दुखापतीमुळे राहुलला आशिया चषकाच्या दोन साखळी सामन्यांना मुकावे लागले आणि किशनला संधी मिळाली. पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ अडचणीत सापडला होता, त्यावेळी कारकीर्दीत प्रथमच पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या किशनने ८२ धावांची अप्रतिम खेळी केली. मात्र, राहुल आता दुखापतीतून सावरला असून भारतीय संघात दाखल झाला आहे.

राहुलने मार्च महिन्यापासून स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. परंतु त्यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होता. त्याने पाचव्या क्रमांकावर खेळताना १८ सामन्यांत ५३च्या सरासरीने ७४२ धावा केल्या आहेत. तसेच यावर्षी दुखापतीपूर्वी त्याने सहा एकदिवसीय सामन्यांत ५६.५०च्या सरासरीने २२६ धावा केल्या होत्या. त्याच्या यष्टिरक्षणातही मोठी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कायम राहुलला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, किशनच्या दमदार कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यांना राहुल आणि किशन यांच्यापैकी एकाला संघाबाहेर ठेवण्याचा अवघड निर्णय घ्यावा लागणार आहे.

‘सुपर फोर’ फेरीतील भारताचा हा पहिलाच सामना आहे, तर पाकिस्तानने यापूर्वी बांगलादेशवर मात करताना दोन गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे भारतावर विजय मिळवण्यात यश आल्यास पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीच्या उंबरठय़ावर पोहोचेल. भारत आणि पाकिस्तान हे संघ यंदाच्या स्पर्धेत दुसऱ्यांना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. साखळी फेरीतील सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता. त्या सामन्यात किशन आणि हार्दिक पंडय़ा वगळता भारताचे फलंदाज पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांसमोर अडचणीत सापडले होते. त्यामुळे भारताला विजय मिळवायचा झाल्यास फलंदाजांना कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे.

भारताच्या आघाडीच्या फळीची पुन्हा कसोटी

कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली या भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांची पुन्हा पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ या वेगवान गोलंदाजांसमोर कसोटी लागणार आहे. साखळी फेरीतील उभय संघांच्या सामन्यात शाहीनने रोहित आणि कोहली यांना बाद केले होते. डावाच्या सुरुवातीला रोहितचे पदलालित्य तितकेसे आश्वासक नसते आणि याच वेळी शाहीनचा सामना करताना तो अडचणीत सापडतो. साखळी सामन्यात दोन बाहेर जाणारे चेंडू टाकल्यानंतर पुढचा चेंडू आतल्या दिशेला आणत शाहीनने रोहितचा त्रिफळा उडवला होता. मात्र, पुढील सामन्यात नेपाळविरुद्ध रोहितने आक्रमक अर्धशतक झळकावले. आता शाहीनविरुद्ध आक्रमक मानसिकतेने खेळण्याबाबत रोहितला विचार करावा लागू शकेल. मधल्या फळीत श्रेयस अय्यरचा खेळपट्टीवर वेळ घालवण्याचा मानस असेल. तसेच राहुल/किशन आणि हार्दिक यांची कामगिरीही भारतासाठी महत्त्वाची ठरेल.

बुमराच्या कामगिरीकडे लक्ष

दुखापतीतून सावरल्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचे जवळपास १४ महिन्यांनंतर भारताच्या एकदिवसीय संघात पुनरागमन झाले. तो पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात खेळला. मात्र, पावसामुळे बुमराला गोलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यानंतर वैयक्तिक कारणास्तव तो मायदेशी परतला आणि त्याला नेपाळविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले. त्यामुळे ‘सुपर फोर’ फेरीतील लढतीत बुमराचे खऱ्या अर्थाने पुनरागमन होऊ शकेल. त्याला अंतिम ११ खेळाडूंत स्थान देताना भारताला मोहम्मद शमीला संघाबाहेर करावे लागू शकेल. शमीने नेपाळविरुद्ध २९ धावांत एक बळी मिळवला होता, तर मोहम्मद सिराजने ६१ धावांत तीन बळी मिळवले होते. परंतु, पाकिस्तानविरुद्ध साखळी सामन्यात सिराज खेळला होता आणि या सामन्यातही त्याचे स्थान कायम राहण्याची शक्यता आहे. फिरकीची धुरा रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यावर असेल. त्यांना बाबर आझम, इमाम-उल-हक, फखर झमान आणि मोहम्मद रिझवान यांना रोखण्याचे आव्हान असेल.

  • वेळ : दुपारी ३ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदी, हॉटस्टार