Asia Cup Trophy Unveiled in Pakistan: आशिया चषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, आशिया कप 2023 च्या ट्रॉफीचे पाकिस्तानमध्ये अनावरण करण्यात आले आहे. बुधवारी एका विशेष कार्यक्रमादरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) ट्रॉफीचे अनावरण केले. आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. त्यामुळे पाकिस्तानात या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी खेळाडू मोहम्मद हाफीज आणि वेगवान गोलंदाज वहाब रियाझ सारखे सुपरस्टार खेळाडू उपस्थित होते.
झका अश्रफ यांनी व्यक्त केला आनंद –
पीसीबी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी आशिया कप ट्रॉफीच्या अनावरणावर आनंद व्यक्त केला. अनेक दिवसांपासून चाहते याची वाट पाहत असून ते यशस्वी करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असे ते म्हणाले. झका अश्रफ म्हणाले की, पाकिस्तान १५ वर्षांनंतर आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे.
आशिया कप स्पर्धेत सहा संघांचा सहभाग –
आशिया कप २०२३ चे वेळापत्रक १९ जुलै रोजी जाहीर करण्यात आले. त्यानुसार एकूण ६ संघ सहभागी होणार आहेत. ३-३ संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळला अ गटात तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. आशिया चषक २०२३ यावर्षी ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल.
आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी आशिया चषक २०२३ हे संघांसाठी एक मोठे व्यासपीठ असेल. गट-अ आणि गट-ब मधील टॉप-2 संघ सुपर-4 टप्प्यात पोहोचतील. सुपर-4 टप्प्यात एकमेकांशी खेळल्यानंतर, टॉप-2 संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचतील.
आशिया कप २०२३ चे वेळापत्रक (फेरी नंबर -१)
३० ऑगस्ट – पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, मुलतान
३१ ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, कॅंडी
२ सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, कॅंडी
३ सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर – भारत विरुद्ध नेपाळ, कॅंडी
५ सप्टेंबर – नेपाळ विरुद्ध अफगाणिस्तान
सुपर-4 (फेरी नंबर -२) –
६ सप्टेंबर – A1 विरुद्ध B2, लाहोर
९ सप्टेंबर – B1 विरुद्ध B2, कँडी
१० सप्टेंबर – AI विरुद्ध A2, कँडी
१२ सप्टेंबर – A2 विरुद्ध B1, डंबुला
१४ सप्टेंबर – A1 विरुद्ध B1, डंबुला
१५ सप्टेंबर – A2 विरुद्ध B2, डंबुला
१७ सप्टेंबर – अंतिम सामना