India vs Pakistan Asia Cup 2023: आशिया चषकापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसने रोहित शर्मा अँड कंपनीला इशारा दिला आहे. क्रिकेट पाकिस्तान या कार्यक्रमात बोलताना वकार म्हणाला की, “पाकिस्तानचा नवा संघ पूर्वीच्या संघांसारखा नाही, तो आता मोठ्या सामन्यांचे दडपण हाताळण्यासाठी सज्ज आहे. २०२१च्या टी२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा १० विकेट्सनी पराभव करत विश्वचषकातील भारताविरुद्ध १२ वेळा पराभूत होणाऱ्या पाकिस्तानने सलग पराभवांची मालिका खंडीत केली. यावेळीही पाकिस्तानचा संघ भारताला हरवू शकतो,” असे वकारचे म्हणणे आहे. कारण पाकिस्तानच्या संघात टीम इंडियापेक्षा जास्त मॅच विनर्स आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वकार युनूसने आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारतापेक्षा चांगले दबाव हाताळल्याबद्दल पाकिस्तानी खेळाडूंच्या सध्याच्या पिढीचे कौतुक केले. वकारने क्रिकेट पाकिस्तान या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, “आमच्या काळात दबाव इतका मोठा प्रश्न नव्हता जितका आता वाटतो. तुम्ही एखाद्या संघाविरुद्ध जितके कमी खेळाल, तेही मोठ्या संघाविरुद्ध विशेषत: जर तो सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात असेल, तर दबाव तिप्पट असेल. कदाचित आमच्या काळात ते तुलनेने कमी होते कारण, आम्ही आमच्या सुरुवातीच्या काळात भरपूर क्रिकेट खेळायचो. पण तरीही विश्वचषकात भारताविरुद्ध हरायचो. मी म्हटल्याप्रमाणे, आजकालच्या खेळाडूंची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. खेळाडू नक्कीच दबाव अधिक चांगल्या प्रकारे हाताळत आहेत. हे मॅच विनर्स, ज्यांचा मी आधी उल्लेख केला आहे, ते आम्हाला सामना जिंकवून देतील.”

हेही वाचा: IND vs WI: विश्वचषकापूर्वी टीम इंडिया अडचणीत आहे का? आकाश चोप्राने भारतावर केली टीका; म्हणाला, “फलंदाजी क्रमात…”

माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वकास युनूस पुढे म्हणाला, “पाकिस्तान संघात अनेक सामने जिंकणारे खेळाडू आहेत. बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि सलामीवीर फखर जमान हे स्वबळावर जिंकू शकतात आणि भारताकडे त्यांचा चांगला रेकॉर्ड आहे. शाहीन-फखर चमत्कार करू शकतात. इमामलाही आपण शानदार खेळी करताना पाहिले आहे. फक्त, संघाने आपली निवड प्रक्रिया योग्य ठेवली पाहिजे आणि दबावाखाली ढेपाळून जाणे टाळले पाहिजे.”

वकार युनूसने रोहित शर्माला दिला इशारा

आशिया चषक २०२३ पूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूसने रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाला इशारा दिला आहे. वकारने क्रिकेट पाकिस्तानशी बोलताना सांगितले की, “नवीन पाकिस्तानी संघ पूर्वीच्या संघांपेक्षा खूप मजबूत आहे. यावेळी आम्ही नक्कीच आशिया चषकाबरोबर विश्वचषकही जिंकू, याची मला खात्री आहे.”

हेही वाचा: Jyothi Yarraji: यश अपयशातील अंतर केवळ ०.०१ सेकंद! विश्वविक्रम रचणाऱ्या ज्योतीचे हुकले पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट

भारत आणि पाकिस्तान एकाच गटात

आशिया चषक २०२३ मध्ये भारतीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त नेपाळच्या संघाचाही ‘अ’ गटात समावेश आहे. दुसरीकडे ‘ब’ गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आहेत. सर्व संघ आपापल्या गटातील संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील. यानंतर गटातील टॉप-२ संघ सुपर-४ मध्ये प्रवेश करतील. येथे सर्व संघ एकमेकांविरुद्ध एक एक सामना खेळतील. सुपर-४ मध्ये अव्वल दोन संघांमध्ये विजेतेपदाचा सामना होणार आहे. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण ३ सामने होऊ शकतात.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup we have match winners india waqar younis warns team india also claims world cup avw
Show comments