India vs Pakistan Asia Cup 2022: संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित आशिया चषकातील सर्वात लक्षवेधी, बहुचर्चित सामना आज २८ ऑगस्टला पार पडणार आहे. या सामन्यात क्रिकेटच्या मैदानातील पूर्वापार शत्रू भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी आता काहीच तास शिल्लक आहेत. आता इतका हाय- व्होल्टेज सामना म्हणजे त्यातील एकही क्षण चुकवता कामा नये असे तुम्हालाही वाटत असेल. अनेकजण तर यासाठी सगळी सोय करून बसतात, बाथरूमला जायचं सुद्धा टाळतात पण तुम्ही इतकं सगळं करताना प्रत्येक ओव्हरनंतर येणारी जाहिरात म्हणजे खरंच कटकट वाटते, हो ना? आता आपण एक सोपा पर्याय पाहणार आहोत ज्यामुळे आजचा व येत्या काही दिवसातील भारताचा प्रत्येक सामना आपण विना जाहिराती सलग पाहू शकता. (Asia Cup 2022 IND Vs PAK: विराट कोहली आज रचणार ‘हा’ मोठा विक्रम; ठरणार भारतातील पहिलाच खेळाडू)

आपल्याला ठाऊक असेल की, आशिया चषक स्पर्धेचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स एचडी वन आणि स्टार स्पोर्ट्स वन हिंदीवर पाहता येईल. तसेच डिस्ने-हॉटस्टारच्या माध्यमातूनही या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. मोबाईल, लॅपटॉप व स्मार्ट टीव्हीवर डिस्ने-हॉटस्टारच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेऊ शकता. जर तुमच्याकडे या सेवांचे सब्स्क्रिप्शन नसेल तर अगदी कमीत कमी खर्चातील हॉटस्टार सब्स्क्रिप्शनचे प्लॅन विचारात घेऊ शकता.

Disney Plus Hotstar स्वस्त सब्स्क्रिप्शन

डिस्ने-हॉटस्टारच्या २९९ च्या प्लॅनमध्ये आपण १ महिन्यासाठी सब्स्क्रिप्शन मिळवू शकता. विशेष म्हणजे हे सब्स्क्रिप्शन आपल्याला टीव्ही, मोबाईल व लॅपटॉपवर सुद्धा वापरता येईल. या प्लॅनमध्ये आपल्याला जाहिरातीशिवाय संपूर्ण मॅच बघता येईल. या प्लानचे वैशिष्ट्य म्हणजे आपण हा आपल्या मित्रांसह सुद्धा शेअर करू शकता कारण यामध्ये एका वेळी चार लॉग इन करता येऊ शकतात. (Asia Cup 2022 IND Vs PAK LIVE: सिनेमागृहात पहा भारत-पाकिस्तान सामना; तुमच्या शहरात कुठे कराल बुकिंग?)

२७ ऑगस्टला सुरु झालेले आशिया चषक सामने हे ११ सप्टेंबरपर्यंत सुरु असणार आहेत. आजच्या मॅच व्यक्तिरिक्त आणखी एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होईल असा अंदाज आहे. आयत्या वेळी इतर कोणाकडूनही हॉटस्टार मागत बसण्याऐवजी अगदी कमीत कमी खर्चात आपण आजच हे सब्स्क्रिप्शन विकत घेऊ शकता.

Story img Loader