अम्मान, जॉर्डन येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बॉक्सिंगपटूंनी विजयी सलामी दिली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या मनोज कुमारने ६४ किलो वजनी गटात जॉर्डनच्या स्थानिक इब्राहिम सालेहला चीतपट करत विजयी सुरुवात केली. नुकत्याच सायप्रस येथे झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत मनोजने रौप्यपदकाची कमाई केली होती. पुढच्या फेरीत मनोजचा मुकाबला श्रीलंकेच्या लाक मोहम्मद दिलशानशी होणार आहे. आक्रमक आणि वेगवान खेळाच्या जोरावर मनोजने शानदार विजय साकारला. उंचीचाही मनोजने सुरेख उपयोग करून घेतला.

Story img Loader