जपानचा धुव्वा, सलग तिसरा विजय

Asian Championship Kabaddi tournament बुसान : महाराष्ट्राच्या अस्लम इनामदारच्या खोलवर चढायांमुळे आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारताची घोडदौड कायम राहिली. सलग तिसरा विजय मिळवताना भारताने बुधवारी जपानचा ६२-१७ असा धुव्वा उडवला.कोरियावर विजय मिळवून जपानने आपली आगेकूच कायम राखली होती. मात्र, भारताच्या तगडय़ा आव्हानापुढे त्यांची दाणादाण उडाली. भारताने पूर्वार्धात १४ मिनिटांत तीन लोण देत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. मध्यंतरालाच भारताने ३२-६ अशी मोठी आघाडी मिळवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तरार्धात भारताने आणखी दोन लोण चढवत आणखी एका दणदणीत विजयाची नोंद केली. उत्तरार्धात जपानला चढाईपटूंकडून दोन ‘सुपर रेड’चा दिलासा मिळाला. भारताच्या सुरजितच्या बचावाला जपानी चढाईपटूंकडे उत्तर नव्हते, तर अस्लमच्या खोलवर चढायांनी जपानचा बचाव खिळखिळा केला. अस्लमने सलग दुसऱ्या सामन्यात दहाहून अधिक गुण कमावले.

स्पर्धेतील अन्य सामन्यात तैवाने हाँगकाँगचा ११७-१२ असा धुव्वा उडवला. जपानने कोरियाचा४५-१८ असा आणि इराणने हाँगकाँगचा ६०-३१ असा पराभव केला. इराणनेही सातत्य कायम राखताना कोरियाला ७२-१७ असे नमवले.