हॉकी बाद फेरीत मजल मारण्याच्या भारताच्या आशेला पाकिस्तानने गुरुवारी सुरुंग लावला. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात प्रतिस्पध्र्याचा धुव्वा उडवणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाला ‘ब’ गटातील सामन्यात पाकिस्तानकडून १-२ अशा निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले.
सरदारा सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानला कडवी लढत दिली. पहिली दोन सत्रे दोन्ही संघांना गोलचे खाते खोलता आले नसले तरी भारताने या दोन्ही सत्रांवर वर्चस्व गाजवले होते. अखेर तिसऱ्या सत्रात मोहम्मद उमर भुट्टाने ३८व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडीवर आणले. त्यानेतर निकिन थिमय्याने ५३व्या मिनिटाला गोल करून भारताला बरोबरी साधून दिली होती. पण दोन मिनिटानंतर लगेचच मोहम्मद वकासने गोल करत पाकिस्तानच्या विजयावर मोहोर उमटवली.
धसमुसळा बचाव असतानाही भारताने पाकिस्तानला खाते खोलू दिले नाही. पण गोलक्षेत्रात असणाऱ्या भुट्टाने भारताच्या चुकीचा फायदा उठवत सामन्यातील पहिला गोल केला. व्ही. आर. रघुनाथला चेंडूवर ताबा मिळवण्यात अपयश आल्याचा फटका भारताला सहन करावा लागला. मात्र चौथ्या सत्रात डाव्या कॉर्नरवरून कोथाजित सिंगने मारलेल्या फटक्यावर थिमय्याने चेंडूला हळूच गोलजाळ्याची दिशा दाखवत भारताला बरोबरी साधून दिली. पण भारताला हा आनंद फार काळ टिकवता आला नाही. दुसऱ्याच मिनिटाला पाकिस्तानचे आक्रमण भारताला थोपवता आले नाही. शाफकत रसूलचा फटका गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने झोपवून अडवला होता. पण मोहम्मद वकासने परतीच्या फटक्यावर गोल करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. आता उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी भारताला २७ सप्टेंबरला होणाऱ्या चीनविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.
बाद फेरीत मजल मारण्याच्या भारताच्या आशेला पाकिस्तानने गुरुवारी सुरुंग लावला. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात प्रतिस्पध्र्याचा धुव्वा उडवणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाला ‘ब’ गटातील सामन्यात पाकिस्तानकडून १-२ अशा निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले.
सरदारा सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानला कडवी लढत दिली. पहिली दोन सत्रे दोन्ही संघांना गोलचे खाते खोलता आले नसले तरी भारताने या दोन्ही सत्रांवर वर्चस्व गाजवले होते. अखेर तिसऱ्या सत्रात मोहम्मद उमर भुट्टाने ३८व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडीवर आणले. त्यानेतर निकिन थिमय्याने ५३व्या मिनिटाला गोल करून भारताला बरोबरी साधून दिली होती. पण दोन मिनिटानंतर लगेचच मोहम्मद वकासने गोल करत पाकिस्तानच्या विजयावर मोहोर उमटवली.
धसमुसळा बचाव असतानाही भारताने पाकिस्तानला खाते खोलू दिले नाही. पण गोलक्षेत्रात असणाऱ्या भुट्टाने भारताच्या चुकीचा फायदा उठवत सामन्यातील पहिला गोल केला. व्ही. आर. रघुनाथला चेंडूवर ताबा मिळवण्यात अपयश आल्याचा फटका भारताला सहन करावा लागला. मात्र चौथ्या सत्रात डाव्या कॉर्नरवरून कोथाजित सिंगने मारलेल्या फटक्यावर थिमय्याने चेंडूला हळूच गोलजाळ्याची दिशा दाखवत भारताला बरोबरी साधून दिली. पण भारताला हा आनंद फार काळ टिकवता आला नाही. दुसऱ्याच मिनिटाला पाकिस्तानचे आक्रमण भारताला थोपवता आले नाही. शाफकत रसूलचा फटका गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने झोपवून अडवला होता. पण मोहम्मद वकासने परतीच्या फटक्यावर गोल करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. आता उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी भारताला २७ सप्टेंबरला होणाऱ्या चीनविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.
महिलांची मलेशियाशी झुंज
चीनकडून निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर आता भारतीय महिला हॉकी संघाने मलेशियाविरुद्ध शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरी गाठण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. या सामन्यात भारताने बरोबरी साधली तरी भारतीय संघ उपांत्य फेरीत मजल मारेल. चीनने ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावले असून भारत आणि मलेशियाचे समान गुण झाल्यामुळे गोलफरकाच्या जोरावर भारत आगेकूच करू शकतो. तरी मलेशियाविरुद्ध भारताचे पारडे जड मानले जात आहे.
देवेंद्र उपउपांत्यपूर्व फेरीत
बॉक्सिंग
आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताला बॉक्सिंगमध्ये संमिश्र यश मिळाले. प्रतिस्पर्धी खेळाडूने माघार घेतल्यामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेतील रौप्यपदक विजेत्या एल. देवेंद्र सिंगने (४९ किलो) उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. पहिल्या फेरीतच पराभव पत्करल्यामुळे मनोज कुमारचे (६४ किलो) आव्हान संपुष्टात आले आहे.
२०१३मध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पध्रेत रौप्यपदक जिंकणाऱ्या देवेंद्रला विजयी घोषित करण्यात आले. कारण प्रतिस्पर्धी बॉक्सर कुवेतचा फहाद अल्बाथालीने माघार घेतली. त्यानंतर २०१०च्या राष्ट्रकुल सुवर्णपदक आणि आशियाई अजिंक्यपद कांस्यपदक विजेत्या मनोजने जपानच्या कवाची मसतसुगूकडून १-२ अशा फरकाने हार पत्करली.
शुक्रवारी शिवा थापा (५६ किलो), कुलदीप सिंग (८१ किलो), अखिल कुमार (६० किलो) आणि अमृतप्रीत सिंग (९१ किलो) यांचे उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत.
युकी भांब्री, सनमची आगेकूच
टेनिस
युकी भांब्री, सनम सिंग आणि अंकिता रैना या भारतीय टेनिसपटूंनी आपापल्या लढती जिंकत आशियाई क्रीडा स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. पुरुषांमध्ये युकी भांब्रीने जबोर मोहम्मद अल मुटावाचा ६-१, ६-० असा धुव्वा उडवला. सनम सिंगने कुवेतच्या ए.एच. अलशाटी अब्दुलहमीदवर ६-१, ६-२ अशी मात केली. महिलांमध्ये अंकिताने मंगोलियाच्या गोटोव्ह डुलगुनजारगलवर ६-०, ६-० असा दणदणीत विजय मिळवला. युकीची पुढची लढत इंडोनेशियाच्या ख्रिस्तोफर बेजामिंन रुंगकाटशी तर सनमचा कोरियाच्या हीऑन च्युंगशी होणार आहे. अंकितासमोर जपानच्या इरि होझुमीचे आव्हान असणार आहे.
जलतरणपटू अपयशीच
जलतरण
भारताच्या चारही जलतरणपटूंना आपापल्या प्रकारात अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. पुरुषांच्या ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात अंशुल कोठारीला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. १०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात आरोन डिसुझाने ५१.२० वेळेसह पाचवे तर नील कॉन्ट्रॅक्टरने ५३.०१ वेळेसह सातवे स्थान मिळवले. २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात प्रतापन नायरला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पाचवे स्थान
अश्वारोहण
अश्वारोहण खेळात कामगिरी सर्वसाधारण झाल्याने भारतीय अश्वारोहणपटूंना पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ड्रेसेज आणि क्रॉसकंट्री फेरीनंतर भारतीय संघ १८०.५० पेनल्टी गुणांसह पाचव्या स्थानी होता. या कामगिरीमुळे भारतीय संघाची पदकाची शक्यता धुसर झाली आहे.
सायकलपटूंची निराशा
सायकलिंग
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष सायकलिंगपटूंची निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली. रिपिचेज प्रकारात अमरजीत सिंग आणि अमरित सिंग यांना पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागेल. यामुळे त्यांचे स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आले आहे. पहिल्या टप्प्यातमध्ये अव्वल दोन स्थान राखणाऱ्या सायकलिंगपटूंना पुढच्या फेरीत प्रवेश मिळणार होता. मात्र या दोघांनाही स्थान मिळवता आले नाही.
भारत कोरियाकडून पराभूत
सेपॅकटेकरॉ
यजमान दक्षिण कोरियाने भारताच्या पुरुष संघाला ३-० असे नमवले. रेगू १,२ आणि ३ मध्ये भारताने लढत गमावली. रेगू १मध्ये भारताने १४-२१ तर रेगू २ मध्ये ११-१ असा पराभव पत्करला. भारतीय महिला संघाचा सामना दक्षिण कोरियाच्या संघाशी होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा