इन्चॉन येथे सुरू असलेल्या  आशियाई  क्रीडा स्पर्धेत शनिवारी भारतीय तिरंदाजी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पुरुषांच्या सांघिक कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. रजत चौहान, संदीप कुमार आणि अभिषेक वर्मा यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारताने सुवर्णपदकावर नाव कोरले. भारतीय संघाने दक्षिण कोरियाचा २२७-२२४ असा पराभव केला.
भारतीय तिरंदाजांनी मोठ्या स्पर्धांमध्ये मिळविलेले हे पहिले सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत भारताला मिळालेले हे दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी नेमबाज जितु राय याने सुवर्णपदक मिळविले होते. महिलांनीही तिरंदाजीत ब्राँझपदक मिळविले. तृषा देव, पुर्वशा शेंडे आणि सुरेखा ज्योती या भारतीय महिला तिरंदाजी संघातील खेळाडूंनी इराणचा २१७-२२४ असा पराभव केला.

Story img Loader