इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या १८ व्या आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटला, हरयाणा सरकारने ३ कोटी रुपयांचं इनाम जाहीर केलं आहे. याचसोबत ट्रॅप नेमबाजीत रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या लक्ष्य शेरॉनलाही इनामाची घोषणा करण्यात आली आहे. लक्ष्यला १.५ कोटींचं इनाम घोषित करण्यात आलेलं आहे. हरयाणा सरकारचे क्रीडामंत्री अनिल विज यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनेश फोगाटने अंतिम फेरीत जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर ६-२ ने मात करत सुवर्णपदकाची कमाई केली. या कामगिरीसोबत विनेश आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तर लक्ष्य शेरॉननेही पदार्पणातचं रौप्य पदकाची कमाई करण्याचा पराक्रम केला आहे. पहिल्या दिवशी बजरंगने जपानी प्रतिस्पर्धी मल्लावर मात करत सुवर्णपदक पटकावलं होतं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian games 2018 haryana govt announces rs 3 crore reward for wrestlers bajrang punia vinesh phogat