– पै. मतीन शेख

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे होत असलेल्या आशियाई स्पर्धेत एकुण १८ भारतीय मल्ल पुर्ण तयारीनिशी उतरले आहेत. मिनी ऑलिम्पिक  संबोधल्या जाणार्‍या या स्पर्धेत भारतीय मल्लांचा शड्डू जोरदार घुमेल अशी आशा सध्या सर्व भारतीय क्रीडा चाहते करत आहेत. दोन वेळेचा ऑलिम्पिक पदकविजेता सुशिल कुमार, तसेच रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक तसेच विनेश फोगाट ही या स्पर्धेत प्रमुख आकर्षण आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

सुशील कुमार अजुनही जोमात – 

सुशील कुमारने भारतीय कुस्तीला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे यात काही वादच नाही. लंडन ऑलिम्पिक नंतर सुशील कुमार आपली कुस्ती थांबवेल असा सर्व कुस्तीप्रेमीचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात असं काहीही घडलं नाही, सुशील काही महिन्यांची विश्रांती घेऊन का होईना मैदानात उतरला आणि आजही आपल्यात अजुन बरीच कुस्ती बाकी आहे हे त्याने दाखवून दिलं आहे. फ्री-स्टाईल ६६ किलो वजनी गटात खेळणारा सुशील पुनरागमनानंतर वजन वाढवुन ७४ किलो वजनी गटात खेळायला लागला. याच गटात त्यांने अलीकडच्या सर्व स्पर्धा ही एकतर्फी जिंकल्या. पैलवानाला आपला वजन गट बदलुन खेळणं सहसा अवघड जातं, वजनगट बदलला की प्रतिस्पर्धी बदलतो आणि त्या नुसार खेळाचं तंत्रही बदलाव लागतं पण सुशीलने आपल्या दिर्घ अनुभवाच्या जोरावर स्वतःचा खेळ चांगला टिकवुन ठेवलाय. सुशीलचं वय वाढत असलं तरी त्याची कुस्ती अजुनही पुर्वीसारखीच आहे. त्याच्या सरावातील सातत्य आणि त्याने काही दिवस जॉर्जियात जाऊन घेतलेलं प्रशिक्षण या आधारे तो चांगल्या दमाच्या मल्लांना सुद्धा आस्मान दाखवत आहे.

काय आहे सुशील कुमारच्या कुस्तीचं वैशिष्ट्य?

सुशीलचा खेळ हा अत्यंत संयमी आहे, तो शांत डोक्याने नेहमी कुस्ती लढतो. कोणत्या क्षणी कुठे हल्ला करायचा आणि प्रतिस्पर्धी पैलवानाकडून आलेला हल्ला कसा परतवायचा याचं चांगलं कौशल्य सुशीलला अवगत आहे. एका-दुसऱ्या धक्क्याने लढताना तो बिथरत नाही, गुण घेण्याची संधी तो कधी सोडत नाही. विरोधी मल्लांच्या हालचाली पाहुन कधी आक्रमक तर कधी बचावात्मक अशी दोन्ही तंत्र तो लढतो. बहुतांश वेळी सुशील उजव्या पवित्र्यावर लढतो (उजवा पवित्रा म्हणजे कुस्तीला सुरुवात करताना पैलवान आपला उजवा पाय पुढे ठेऊन खेळाला सुरुवात करतो) किंवा परिस्थीतीनुरूप दोन्ही पवित्र्यावर समतोल राहून विरोधी मल्ल्याच्या पटात घुसतो. ‘बगल डुब’ हा देखील सुशीलच्या भात्यातला एक महत्वाचा बाण आहे. (समोरच्या मल्लावर जलद आक्रमण करत त्याच्या बगलेत घुसून पाठीवर जाणं) या डावाचा वापर करत आंतरराष्ट्रीय कुस्तीत सुशीलने अनेकवेळा प्रतिस्पर्धी पैलवानावर आपलं वर्चस्व गाजवलं आहे. याव्यतिरीक्त कुस्तीतले धोबी पछाड, इराणी भरणे, कात्री लावणे हे पारंपरिक डावही सुशीलच्या पोतडीत आहेत. एकदा प्रतिस्पर्धी पैलवान थकला की सुशील एखाद्या कसलेल्या योद्ध्याप्रमाणे भारंदाज डाव वापरत (प्रतिस्पर्धी पैलवानावर ताबा मिळवून त्याला संपूर्ण मॅटवर रोलिंग करायला लावणं) सामना आपल्या नावावर करतो.

यंदाच्या स्पर्धेतही सुशील कुमारकडून अशाच कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. त्याचा आतापर्यंतचा फॉर्म पाहता तो भारताला पदक मिळवून देईल यात काही शंकाच नाही. मात्र असं असलं तरीही इराण आणि कझाकिस्तान या देशाच्या मल्लांचं सुशील पुढे तगडं आव्हान असेल. मात्र सुशील आपल्या अनुभवाच्या जोरावर इंडोनेशियात तिरंगा फडकावेल यात काही शंकाच नाही.

Story img Loader