Asian Games 2023: महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील अविनाश साबळेने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण आणि रौप्य असे सलग दोन पदके जिंकली. महाराष्ट्राच्या या पठ्ठ्याने चीन भारताचा तिरंगा दिमाखात फडकावत एक इतिहास घडवला आहे. भारतीय लांब पल्ल्याच्या धावपटू अविनाश साबळेने बुधवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ५००० मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकून आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली. साबळेचे या खेळांमधील हे दुसरे पदक आहे. गेल्या आठवड्यात त्याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकले.  

२९ वर्षीय भारतीय खेळाडूने १३ मिनिटे २१.०९ सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले. बहारीनच्या बिरहानू यामाताव बालेव याने १३:१७:४० या वेळेत सुवर्णपदक पटकावले, तर त्याचाच देशबांधव दाविट फिकाडू अदमासू याने १३:२५:६३ या वेळेत कांस्यपदक पटकावले. आणखी एक भारतीय खेळाडू गुलवीर सिंगने १३:२९:९३च्या वेळेसह आपली सर्वोत्तम कामगिरी केली परंतु तो चौथ्या स्थानावर राहिला.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Sanskruti More, a visually challenged chess player, satara district
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
Gautam Gambhir has challenged Australia ahead Border-Gavaskar Trophy
Gautam Gambhir : ‘कोणत्याही प्रकारची खेळपट्टी तयार करा, आम्ही…’, गौतम गंभीरने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला दिले आव्हान
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा

३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकले

अविनाश साबळेने २०२३ आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८:१९:५० सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले होते. यापूर्वी २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये 8 मिनिटे ११.२० सेकंद वेळेसह रौप्य पदक जिंकले होते. अविनाश साबळेची हंगामातील सर्वोत्तम वेळ ८:११.६३ आहे, ज्यामुळे तो आशियाई क्रीडा स्पर्धेत जपानच्या मिउरा र्युजी (SB: ८:०९.९१)च्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे.

भारतासाठी उत्तम ११वा दिवस

आशियाई क्रीडा स्पर्धेचा ११वा दिवस भारतासाठी खूप छान ठरला. भारताने एकूण १२ पदके जिंकली. यामध्ये तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेतील हा दुसरा दिवस होता जेव्हा भारताने १० हून अधिक पदके जिंकली होती. याआधी आठव्या दिवशी भारताला १५ पदके मिळाली होती.

हेही वाचा: ENG vs NZ Live Streaming: न्यूझीलंड-इंग्लंड सामन्याने वर्ल्डकप २०२३चे वाजणार बिगुल; कधी, कुठे पाहणार लाइव्ह स्ट्रिमिंग? जाणून घ्या

दिवसाची सुरुवात ३५ किमी शर्यतीत कांस्यपदकाने झाली. मंजू राणी आणि राम बाबू या जोडीने देशाला दिवसाचे पहिले पदक जिंकून दिले. यानंतर ओजस आणि ज्योतीने तिरंदाजीत सुवर्णपदक पटकावले. स्क्वॉशमधील अनहत-अभयचा प्रवास कांस्यपदकावर संपला. बॉक्सिंगमध्ये प्रवीण हुडाने कांस्यपदक तर लव्हलिनाने रौप्यपदक जिंकले. ग्रीको-रोमन शैलीतील कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकण्यात सुनील कुमारला यश आले. हरमिलन बैंसने ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक तर अविनाश साबळे याने ५००० मीटर शर्यतीत रौप्यपदक पटकावले. दिवसअखेर पदकांचा पाऊस पडला. महिला रिले संघाने ४०० मीटर रिले शर्यतीत रौप्यपदक पटकावले. भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्ण आणि किशोर जेनाने रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. दिवसाचा शेवट पुरुष संघाने ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्ण जिंकून केला. आता भारतासाठी पदकांचे शतक झळकावणे खूप सोपे होणार आहे.

हेही वाचा: Asian Games: एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी केली पदकांची लयलूट, पुरुष संघाने ४x४०० मीटर रिलेमध्ये जिंकले सुवर्ण, तर महिलांनी रौप्यपदक

भारताकडे किती पदके आहेत?

सुवर्ण: १८

रौप्य: ३१

कांस्य: ३२

एकूण: ८१