Asian Games 2023, IND W vs MAL W: भारतीय महिला क्रिकेट संघाचा हांगझाऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. अव्वल मानांकित असल्याने भारताला थेट उपांत्यपूर्व सामना खेळावा लागला. मलेशियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने १७३ धावा केल्या. पावसामुळे सामना १५ षटकांचा करण्यात आला आणि प्रत्युत्तरात मलेशिया संघाला दोन चेंडूत केवळ एक धाव करता आली. त्यानंतर पाऊस सुरू झाल्याने पुढील खेळ होऊ शकला नाही. यानंतर सामना रद्द करण्यात आला आणि भारताने चांगल्या रँकिंगच्या आधारे उपांत्य फेरी गाठली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसामुळे सामना रद्द झाला

सततच्या पावसामुळे बराच वेळ वाया गेला आणि आता सामना रद्द करण्यात आला आहे. चांगल्या रँकिंगच्या जोरावर टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत अव्वल मानांकित टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळण्याची संधी मिळाली. मलेशियाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर बंदीमुळे हा सामना खेळू शकली नाही आणि स्मृती मंधानाने संघाची कमान सांभाळली.

तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या सामन्यात मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने १७३ धावा केल्या. पावसामुळे सामना १५ षटकांचा करण्यात आला होता. डकवर्थ लुईस नियमानुसार मलेशियासमोर १७७ धावांचे लक्ष्य आहे. भारताची सलामीवीर शफाली वर्माने अफलातून अर्धशतकी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. तिने ३९ चेंडूत ६७ धावांची खेळी केली, त्यात तिने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. कर्णधार स्मृती मंधांनाने १६ चेंडूत २७ धावा केल्या, त्यात तिने ५ चौकार मारले. दोघांमध्ये ५७ धावांची शानदार अर्धशतकी भागीदारी झाली. त्यानंतर विकेटकीपर जेमिमाह रॉड्रिग्जने २९ चेंडूत ४७ धावांची आक्रमक खेळी केली, त्यात तिने ६ चौकार मारले. तिला रिचा घोषने ७ चेंडूत २१ धावा करत चांगली साथ दिली. मलेशियाकडून सात खेळाडूंनी गोलंदाजी केली, मात्र केवळ इस्माईल आणि इलसा यांना प्रत्येकी एक विकेट घेता आली.

भारतीय संघ हा एशियाडमधील सर्वोच्च मानांकित संघ आहे. सुवर्णपदक जिंकण्यासाठी त्यांना केवळ तीन विजय मिळवावे लागतील. टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली तर हरमनप्रीतला विजेतेपदाचा सामना खेळण्याची संधी मिळेल. येथील तिन्ही सामने भारतासाठी बाद फेरीतील असतील. भारत आणि मलेशिया यांच्यातील सामना पिंगफेंग क्रिकेट फील्ड, झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, हांगझाऊ येथे हा सामना खेळवला गेला.

हेही वाचा: ICC T20 World Cup 2024: टी२० विश्वचषक २०२४साठी ICCने तीन ठिकाणांच्या नावांना दिली मान्यता, कोणते आहेत ते? जाणून घ्या

नऊ वर्षांनी क्रिकेटचा आशियाई क्रीडा स्पर्धेत झाला समावेश

नऊ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी २०१० आणि २०१४च्या आशियाई खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता, परंतु भारताने या दोन्ही स्पर्धांमध्ये एकही संघ उतरवला नाही, त्यामुळे २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून क्रिकेटला वगळण्यात आले होते. बीसीसीआयनेही या सामन्यांमध्ये शेवटच्या क्षणी संघ उतरवले आहेत. भारताने महिला आशिया चषक सात वेळा जिंकला आहे तसेच, भारतीय संघ सध्याचा आशियाई चॅम्पियनही आहे. एवढेच नाही तर भारतीय संघाने गेल्या तीन टी२० विश्वचषकांमध्ये उपांत्य फेरीत किंवा त्यापुढेही मजल मारली आहे.

थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला

भारताचा आशिया खंडातील उत्कृष्ट विक्रम लक्षात घेता तो येथे सुवर्णपदकाचा दावेदार मानला जात आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या अव्वल चार संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. मलेशियाने मंगळवारी हाँगकाँगचा २२ धावांनी पराभव केला. त्यामुळे आज ते भारताविरुद्ध सामना खेळत आहेत. भारत आणि मलेशिया याआधीही दोनदा भिडले आहेत, त्यात दोन्ही वेळा भारताने विजय मिळवला आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताने विजय मिळवला असून उपांत्य फेरीत त्यांचा सामना बांगलादेशशी होऊ शकतो. दुसरीकडे पाकिस्तानचा सामना इंडोनेशियाशी होणार आहे.

हेही वाचा: IND vs AUS 1st ODI: वर्ल्डकपच्या तयारीची भारताला शेवटची संधी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अश्विनला मिळणार का संधी?

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत

भारत: स्मृती मंधांना (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड, कनिका आहुजा, अमनजोत कौर.

मलेशिया: आइना हमिझाह हाशिम, विनिफ्रेड दुराईसिंगम (कर्णधार), मास अलिसा, वान ज्युलिया (विकेटकीपर), माहिरा इज्जती इस्माईल, आयना नजवा, वान नूर जुलैका, नूर अरियाना नटस्या, अस्या अलिसा, नूर दानिया सिउहादा, निक नूर अटिएला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian games 2023 ind vs mal team india set a target of 177 runs in front of malaysia avw
Show comments