Anant Jeet Singh Wins Silver in Men’s Skeet Shooting Event: आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारताची सातत्याने उत्कृष्ट कामगिरी दिसून येत आहे आणि त्यामुळे पदकांची संख्याही वाढत आहे. आता नेमबाजीत अनंतजीत सिंगने पुरुषांच्या स्कीट स्पर्धेत ५८ गुणांसह रौप्यपदक जिंकले आहे. या स्पर्धेत कुवेतच्या अब्दुल्ला अल रशिदीने ६० पैकी ६० गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले.
अनंतजित सिंगने ६० पैकी ५८ गुण मिळवले. आशियाई क्रीडा २०२३ मधील नेमबाजीतील भारताचे हे ११वे पदक आहे. मागील आवृत्त्यांच्या तुलनेत ही आतापर्यंतची सर्वोत्तम शूटिंग कामगिरी आहे. आदल्या दिवशी नेमबाजीत पुरुषांच्या स्कीट सांघिक स्पर्धेत भारताने कांस्यपदक जिंकले होते. यामध्ये भारतीय संघाचा स्कोर ३५५ होता. चीनने सुवर्ण, तर कतारच्या संघाने रौप्यपदक जिंकले. पुरुषांच्या स्कीट एकेरीत भारताने तब्बल ४९ वर्षांनंतर पदक जिंकले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत २२ पदके जिंकली आहेत. यामध्ये ५ सुवर्ण, ७ रौप्य आणि १० कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताने १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.
२५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले
२०२३च्या आशियाई खेळांमध्ये नेमबाजीच्या स्पर्धांमध्ये भारताचा दबदबा दिसून आला. मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी २५ मीटर पिस्तुल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळविले. याशिवाय महिलांच्या २५ मीटर पिस्तुल नेमबाजीत ईशा सिंगने रौप्यपदक पटकावले. देशाला अजूनही नेमबाजीच्या इतर स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याच्या पूर्ण आशा आहेत. नेमबाजीत भारताच्या सिफ्ट कौर समरा हिने महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये सुवर्णपदक जिंकले.
४९ वर्षांनंतर पदक मिळाले
पुरुषांच्या स्कीट एकेरीत भारताने तब्बल ४९ वर्षांनंतर पदक जिंकले आहे. या स्पर्धेत अनंतजित सिंगने चमकदार कामगिरी करत ४९ वर्षांचा दुष्काळ संपवला. आशियाई खेळ २०२३ मध्ये भारताची दमदार कामगिरी सुरू आहे आणि आतापर्यंत देशाने एकूण २२ पदके जिंकली आहेत, ज्यात ५ सुवर्ण, ७ रौप्य आणि १० कांस्य पदकांचा समावेश आहे. १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेतही भारताने सुवर्णपदक पटकावले.
आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारताला आज आपल्या नेमबाजांकडून आणखी काही पदकांची अपेक्षा असेल. भारताला स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा आणि तिसऱ्या दिवशी तीन पदके मिळाली. एकूण २२ पदकांसह भारत पदकतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. यामध्ये ५ सुवर्ण, ७ रौप्य आणि १० कांस्य पदकांचा समावेश आहे. आज नेमबाजीत २ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्यपदके जिंकली.