Asian Games 2023, Squash: आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज सातवा दिवस आहे. भारताने सात दिवसांत एकूण ३६ पदके जिंकली. भारताला स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन आणि सहाव्या दिवशी आठ पदके मिळाली. सातव्या दिवशी भारताला अॅथलेटिक्स आणि नेमबाजीमध्ये पदके मिळू शकतात. आज तीन बॉक्सर प्रीती, लोव्हलिना आणि नरेंद्र यांनी आपली पदके निश्चित केली आहेत. तसेच, भारताच्या पुरुष संघाने स्क्वॉशच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करत १०वे सुवर्ण जिंकले.

स्क्वॉशमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले

स्क्वॉशमध्ये भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. २०१४ नंतर प्रथमच भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत हे पदक जिंकले आहे. भारतासाठी, १८ वर्षीय अभय सिंगने अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत तणावपूर्ण परिस्थितीत चमकदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील या खेळातील भारतीय संघाचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी २०१४ मध्ये भारताने मलेशियाला हरवून सुवर्णपदक जिंकले होते.

AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या
Korea Masters Badminton Tournament Kiran George in semifinals sport news
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जॉर्ज उपांत्य फेरीत
Mohammed Rizwan Takes DRS After Consulting With Adam Zampa and Loses Review Watch Video AUS vs PAK 2nd ODI
PAK vs AUS: हा काय प्रकार? मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या सांगण्यावरून घेतला रिव्ह्यू अन् सापडला अडचणीत; पाहा VIDEO
Pakistan Beats Australia by 9 Wickets in Marathi
Pakistan Beat Australia by 9 Wickets: पाकिस्तानसमोर ऑस्ट्रेलिया चारी मुंड्या चीत! वर्ल्ड चॅम्पियन संघाविरूद्ध पाकिस्तानने नोंदवला वनडेमधील सर्वात मोठा विजय

अंतिम फेरीच्या तिसऱ्या सामन्यात अभय सिंगने पाकिस्तानच्या जमान नूरचा ११-७, ९-११, ७-११, ११-९, १२-१० असा पराभव करत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. याआधी या सामन्यात सौरव घोषालने महंमद असीम खानचा पराभव केला होता, तर महेश माणगावकरला नासिर इक्बालविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.

नरेंद्रने बॉक्सिंगमध्ये पदक निश्चित केले

भारतीय हेवीवेट स्टार नरेंद्रने इराणच्या इमान रमदानपुरदेलावरचा पराभव करून पुरुषांच्या +९२ किलो गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि त्याच्या पदकावर शिक्कामोर्तब केले. +९२ किलो मध्ये फक्त दोन कोटा उपलब्ध आहेत, त्यामुळे २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांचे स्थान बुक करण्यासाठी त्यांना अंतिम फेरी गाठावी लागेल. नरेंद्रच्या आधी प्रीती आणि लव्हलिना यांनी बॉक्सिंगमध्ये पदक मिळवले होते.

हेही वाचा: IND vs PAK: ‘शत्रू राष्ट्र’ या विधानावर झका अश्रफ यांनी घेतला यू-टर्न, पीसीबीने दिले स्पष्टीकरण; म्हणाले, “पारंपारिक प्रतिस्पर्धी…”

मीराबाई चानूचे निराशजनक प्रदर्शन

टोकियो ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३मध्ये सर्वांना निराश केले आहे. स्नॅचमध्ये तिला फक्त ८३ किलो वजन उचलता आले. तिला दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात ८६ किलो वजन उचलता आले नाही. तर क्लीन अँड जर्कमध्ये त्याने पहिल्याच प्रयत्नात १११ किलो वजन उचलले. मागील वर्षी बर्मिंगहॅममध्ये झालेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. मात्र, आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला दुखापतीमुळे अपयश आले.

हेही वाचा: ICC World Cup 2023 squad: १५० खेळाडू, १० संघ, ४४ दिवस; विश्वचषकाच्या महाकुंभमेळ्याला सुरुवात, कोणाला मिळाली संधी? जाणून घ्या

टेनिसमध्ये सुवर्ण

रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले यांनी मिश्र दुहेरी टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. सलामीचा सेट २-६ असा गमावल्यानंतर भारतीय जोडीने शानदार पुनरागमन केले. त्यांनी सुपर टायब्रेक १०-४ असा जिंकला. २००२च्या आशियाई खेळापासून या खेळात सुवर्णपदक जिंकण्याचा भारताचा सिलसिला कायम आहे. रोहन बोपण्णा आता दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत चॅम्पियन आहे! त्याने २०१८ मध्ये दिविज शरणसह पुरुष दुहेरी जिंकली आणि आता ऋतुजा भोसलेसह मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले आहे.