Ruturaj Gaikwad Team India’s captain in Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. शिखर धवनची निवड करून त्याला कर्णधार बनवता येईल, असे यापूर्वीच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात होते, पण तसे झाले नाही. धवनला डच्चू देत मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेट स्पर्धा २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत टी२० स्वरूपात होणार आहे.

१९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. १५ सदस्यीय संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाड यांच्याकडे असेल. युवा खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. रिंकू सिंग, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा हे स्टार खेळाडूही भारतीय संघात आहेत. या तिन्ही खेळाडूंनी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची संख्या अधिक आहे. तसेच या खेळाडूंच्या निवडीवरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की ते विश्वचषकासाठी संघ व्यवस्थापनाच्या विचाराधीन नाहीत.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव

त्यामुळे वरिष्ठ खेळाडूंना स्थान मिळाले नाही

२०१० आणि २०१४ मध्ये बीसीसीआयने इतर काही कारणास्तव संघ पाठवला नव्हता. यावेळी पुरुषांची आयसीसी क्रिकेट स्पर्धा आणि आशियाई क्रीडा यांच्या तारखा एकमेकांत येत असल्याने बीसीसीआयची मोठी अडचण झाली होती. यामागील कारण म्हणजे भारताच्या विश्वचषकाच्या तयारीत या सर्व तारखा अडसर ठरत होत्या. त्यामुळे वरिष्ठ खेळाडूंना या आशियाई क्रीडा स्पर्धेत पाठवले जाणार नाही. म्हणूनच युवा ऋतुराजच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळणार आहे. शिखर धवनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, त्याच्या निवड न करून त्याला स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत की, संघ व्यवस्थापन आता त्याच्याबद्दल विचार करत नाही, त्याची कारकीर्द जवळपास संपली आहे.

हेही वाचा: Ishan Kishan: ना शतक ना अर्धशतक, इशानच्या ‘त्या’ गोष्टीसाठी डाव लांबल्याने रोहित शर्मा भडकला, video व्हायरल

आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसऱ्यांदा क्रिकेट

आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट खेळाचा सहभाग असण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०१० आणि २०१४ मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. मात्र, भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष किंवा महिला संघ कधीच पाठवले नाहीत. पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये, बांगलादेश आणि श्रीलंकेने प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकले आहे आणि महिलांमध्ये, पाकिस्तानने दोन्ही वेळा सुवर्णपदक जिंकले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा पुरुष संघ:

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी , शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक).

स्टँडबाय खेळाडू: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन.