आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिस-या दिवशी भारताच्या स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलला कांस्य पदकावरच समाधान मानवं लागले आहे. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या निकोल डेव्हिडने दीपिकावर ११-४, ११-४, ११-५ अशी मात केली. असे असले तरी, आशियाई स्क्वॉशमध्ये महिला एकेरीचे पदक मिळवणारी दीपिका पहिलीच भारतीय ठरली आहे. दुसऱया बाजूला स्क्वॉशपटू सौरव घोषालने पुरूष एकेरीत मलेशियाच्या ओंग बेंग हे चा ११-९,११-४,११-५ असा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे सौरवचे रौप्य पदक निश्चित झाले आहे.
नेमबाजीत भारतीय नेमबाजांनी तिसऱया दिवशीही चांगला खेळत करत सांघिक स्पर्धेत हीना सिद्धू, राही सरनोबत आणि अनिसा सय्यद यांनी  २५ मीटर पिस्तूलच्या प्रकारात कांस्य पदक पटकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा