पीटीआय, हांगझो (चीन)

अखेरच्या क्षणी संघाची निवड झाल्यामुळे भारतीय फुटबॉल संघ सराव सत्र व पुरेशा विश्रांतीशिवाय मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉलच्या साखळी फेरीत चीनचा सामना करेल. इंडियन सुपर लीगच्या काही संघांनी आपल्या खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग होण्यास मंजुरी दिली नाही. त्यामुळे भारताने शुक्रवारी आपल्या अंतिम संघाची घोषणा केली. संघ रविवारी चीनला रवाना झाला, ज्यामध्ये खेळाडूंना एकत्र सराव करण्याची संधी मिळाली नाही.

Hardik Pandya Shivam Dube Partnership Record with Fifty for 6th Wicket IND vs ENG 4th T20I
IND vs ENG: हार्दिकचा नो-लूक षटकार तर शिवम दुबेचं दणक्यात पुनरागमन; दुबे-पंड्याने अर्धशतकांसह भारतासाठी रचली विक्रमी भागीदारी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Loksatta anvyarth Is there a sign of India China relations
अन्वयार्थ: भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणांचे संकेत?
Ranji Trophy Cricket Tournament Mumbai vs Meghalaya match sports news
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईला विजय अनिवार्य,आजपासून मेघालयाशी गाठ; बडोदा विरुद्ध जम्मूकाश्मीर लढतीवरही लक्ष
IND vs ENG Michael Vaughan slams Suryakumar Yadav for poor outing against England in T20I series
IND vs ENG : ‘तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाऊंड्री मारु शकत नाही…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा सूर्यकुमार यादवला सल्ला
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
England Beat India by 26 Runs Varun Chakravarthy Fifer Ben Duckett fifty IND vs ENG
IND vs ENG: टीम इंडियाची हुकली विजयाची हॅट्ट्रिक! इंग्लंडचं टी-२० मालिकेत दणक्यात पुनरागमन; वरूण चक्रवर्तीच्या कामगिरीवर फेरलं पाणी
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल

भारताच्या २२ सदस्यीय संघातील दोन खेळाडू बचावपटू कोन्सम चिंगलेनसाना सिंह व लालचुंगनुंगा यांना ‘व्हिसा’ तयार नसल्याने ते नंतर संघासोबत येतील. हे दोघेही चीनविरुद्ध होणाऱ्या सामन्यात उपलब्ध नसतील. त्यामुळे भारताला फटका बसण्याची शक्यता आहे. अनुभवी बचावपटू संदेश झिंगन आणि तारांकित आघाडीपटू सुनील छेत्री पहिल्या सामन्यात खेळणार नाही. कारण संघ व्यवस्थापन त्यांना पुढील दोन सामन्यांत उतरवण्याच्या विचारात आहे, असे भारताचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांनी सांगितले. भारताकडे बांगलादेश (२१ सप्टेंबर) व म्यानमार (२४ सप्टेंबर) संघांविरुद्ध विजयाची संधी जास्त आहे. चीन मजबूत संघ आहे आणि भारतीय संघ पुरेसा सराव व विश्रांतीशिवाय या सामन्यात खेळेल. या सर्व परिस्थितीकडे पाहता मुख्य प्रशिक्षकांना आपली रणनीती आखावी लागली.

हेही वाचा >>>IND VS AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, केएल राहुलकडे नेतृत्व, तीन खेळाडूंचं पुनरागमन

चीन आपल्या देशात खेळत असल्याचा फायदा त्यांना मिळेल. आशियाई क्रीडा स्पर्धेत या दोन्ही देशांमधील अखेरचा सामना २००२ मध्ये कोरियाच्या बुसान येथे झाला होता. त्यावेळी भारताला ०-२ असे पराभूत व्हावे लागले होते. चीनविरुद्ध सामना जिंकण्याची भारताला कमी संधी असल्याची कल्पना स्टिमॅच यांना आहे. ‘‘चीनचा संघ बऱ्याच काळापासून एकत्र सराव करत आहे. त्यांनी मार्चमध्ये मजबूत संघांविरुद्ध चार सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना तीनमध्ये पराभव तर, एका सामन्यात विजय मिळाला. त्यामुळे हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. आम्ही साखळी फेरीच्या पुढे आगेकूच करू शकतो. मात्र, त्यासाठी आम्हाला नशिबाचीही साथ मिळायली हवी. यासह संघातील खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरीही करावी लागेल,’’ असे स्टिमॅच यांनी सांगितले. संघांची विभागणी सहा गटात करण्यात आली आहे. गटातील शीर्ष दोन संघ आणि दुसऱ्या स्थानावर असणारे चार सर्वश्रेष्ठ संघ उपउपांत्यपूर्व फेरीत आगेकूच करतील.

’ वेळ : सायं. ५ वा.
’ थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स ,टेन ५

Story img Loader