When and Where to Watch Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन चीनमधील हांगझोऊ शहरात होत आहे. ही स्पर्धा अधिकृतपणे २३ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि ८ ऑक्टोबर रोजी संपेल. मात्र, फुटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस आणि क्रिकेटसह काही स्पर्धा अधिकृत प्रारंभ तारखेपूर्वी सुरू होतील. याचे थेट सामने तुम्ही टीव्ही आणि मोबाईल अ‍ॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारतीय खेळाडू ३९ खेळांमध्ये पदकांसाठी स्पर्धा करतील. या स्पर्धेची १९वी आवृत्ती २०२३ मध्ये होणार होती, परंतु कोरोना महामारीमुळे ती एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. आशियाई खेळ २०२३मध्ये ४० खेळांमधील ४८१ स्पर्धा असतील ज्यात ४५ देशांतील खेळाडूंचा समावेश असेल.

भारताच्या ६५५ सदस्यीय चमूमध्ये अ‍ॅथलेटिक्सचे ६८ सदस्य आहेत. यामध्ये ३५ पुरुष आणि ३३ महिला आहेत. भारतीय क्रिकेट संघ प्रथमच या स्पर्धेचा भाग बनला आहेत. पुरुष संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड आणि महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानू, बॉक्सर लव्हलिना बोर्गोहाइन आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया, सर्व ऑलिम्पिक पदक विजेते देखील हांगझोऊमध्ये पदके मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

हेही वाचा: Mohammed Shami: वर्ल्डकप २०२३ पूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, घरगुती हिंसाचार प्रकरणात मोहम्मद शमीला जामीन मंजूर

१९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पॅरिस २०२४ ऑलिम्पिकसाठी सर्व क्रीडा प्रकार मिळून ७४ जागांचा पात्रता मिळवण्यासाठी कोटा ठेवण्यात आला आहे. यामध्ये धनुर्विद्या (आर्चरी) मध्ये ६, जलतरणात (रोइंग) १०, बॉक्सिंगमध्ये ३४, ब्रेकिंगमध्ये २, हॉकीमध्ये २, पेंटॅथलॉनमध्ये १०, सेलिंगमध्ये ६, टेनिसमध्ये २ आणि वॉटर पोलोमध्ये २ अशा ९ स्पर्धामध्ये ७४ जागांसाठी पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा ठेवण्यात आला आहे. भारतात आशियाई खेळ २०२३चे थेट प्रक्षेपण हे १९ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे.

हेही वाचा: IND vs SL, Asia Cup: शोएब अख्तरने मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीचे दोन शब्दांत वर्णन केले; म्हणाला, “ये तो तबाही, विनाश…”

आशियाई खेळांच्या थेट प्रक्षेपणाशी संबंधित सर्व माहिती आम्ही तुम्हाला येथे देत आहोत:

आशियाई खेळ कधी आयोजित केले जातील?

अधिकृत आशियाई खेळ २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत, परंतु फुटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस आणि क्रिकेटसह अनेक खेळ १९ सप्टेंबरपासून सुरू होतील.

आशियाई खेळ कुठे होत आहेत?

आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन चीनमधील हांगझोऊ शहरात होत आहे.

भारतातील आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या टीव्ही चॅनलवर पाहता येतील?

आशियाई क्रीडा स्पर्धा भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केल्या जातील. सोनीच्या विविध चॅनेलवर तुम्ही विविध क्रीडा स्पर्धा पाहू शकता.

आशियाई खेळांचे थेट प्रेक्षपण डिजिटलवर कोठे उपलब्ध आहे?

तुम्ही Sony Liv अ‍ॅपवर आशियाई खेळांचे सर्व कार्यक्रम पाहू शकता. या सामन्याशी संबंधित बातम्या तुम्ही Loksatta.com वर देखील वाचू शकता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian games live streaming 40 games 481 events and over 1000 medals when and where will all these matches be seen find out avw