आशियाई क्रीडा स्पर्धा अर्थात एशियन गेम्समध्ये याआधी भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी ही ७० पदकांची होती. यंदा मात्र भारतानं तो आकडा केव्हाच पार केला आहे. एवढंच नाही, तर एक नवा इतिहास रचत भारतानं आता पदकांची शंभरी पार केली आहे. या कामगिरीच्या रुपानं भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा मोठ्या सन्मानानं रोवला गेला आहे. गेल्या ६० वर्षांतली ही भारताची एशियन गेम्समधली सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. आता पदकतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारी भारताच्या भात्यात ८६ पदकं होती. काल दिवसभरात हॉकी (सुवर्णपदक), तिरंदादी (रौप्य व कांस्य पदक), ब्रिज (रौप्य), बॅडमिंटन (रौप्य) व रेसलिंग (३ रौप्य) अशा पदकांची लयलूट केली. आज सकाळी भारतीय खेळाडूंनी विजयी कामगिरी करताना तिरंदाजीत तीन, कबड्डीत दोन व बॅडमिंटन आणि पुरुष क्रिकेटमध्ये एक अशा पदकांची निश्चिती केली आहे. त्यामुळे आता भारताची पदकसंख्या शंभरीपार गेली आहे!

Asian Games: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, ९ वर्षांनी सुवर्णपदकावर कोरले नाव

“आमचं स्वप्न सत्यात उतरेल याचा विचारही केला नव्हता”

“आम्ही चीनमध्ये आशियाई स्पर्धांसाठी येताना १०० पदकांचं लक्ष्य ठेवलं होतं हे खरं आहे. पण आम्ही असा विचार केला नव्हता की आमचं स्वप्न अशा प्रकारे सत्यातही उतरेल. आता आम्ही ते अगदी सहज साध्य करत आहोत. मी देशाच्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो. शिवाय, सपोर्ट स्टाफ, खेळाडूंचे प्रशिक्षक या सगळ्यांच्या मदतीनेच हे लक्ष्य साध्य करणं शक्य झालं आहे”, अशी प्रतिक्रिया भारताचे आशियाई स्पर्धेतील प्रमुख भूपिंदर सिंग बाजवा यांनी दिली.

याआधीची सर्वोत्तम कामगिरी..७० पदकं!

दरम्यान, याआधी पाच वर्षांपूर्वी जकार्तामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये भारतानं ७० पदकं जिंकत आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदनली होती. त्या वर्षी पदकांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानी होता. त्यानंतरच्या प्रत्येक स्पर्धेत पदकांच्या बाबतीत भारत चौथ्या किंवा पाचव्या स्थानी राहिला. या वर्षी १०० पदकांसह भारत चीन, जपान व दक्षिण कोरियापाठोपाठ चौथ्या स्थानी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian games medal tally india crossed 100 creating historical performance pmw