Asian Games Opening Ceremony 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १९व्या आवृत्तीला आज भव्य उद्घाटन सोहळ्याने सुरुवात होणार आहे. यात ४० विविध खेळ आणि आशियातील ४५ देशांतील प्रतिभावान खेळाडूंचा एक मोठा समूह असेल. १९ सप्टेंबरला जरी काही क्रीडा स्पर्धा आधीच सुरू झाल्या असल्या, तरी २३ सप्टेंबर रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अधिकृतपणे स्पर्धेची सुरुवात करेल, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह वाढेल. भारतात हा कार्यक्रम कधी आणि किती वाजता सुरू होईल, हे जाणून घ्या. स्थळ काय आहे आणि तुम्ही त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात कुठे पाहू शकता? संपूर्ण तपशील इथे वाचू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यजमान देशाच्या समृद्ध संस्कृती आणि वारशाचे प्रतिनिधित्व करणे आणि सहभागी देशांमधील क्रीडा भावना प्रदर्शित करणे हा या समारंभाचा उद्देश आहे. चीनमध्ये होणार्‍या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये होणार होत्या परंतु, कोरोना महामारीमुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या. आशियाई खेळ दर चार वर्षांनी एकदाच होतात. मागील आशियाई क्रीडा स्पर्धा या इंडोनेशियातील पालेमबर्ग जकार्ता येथे २०१८ साली झाल्या होत्या.

हेही वाचा: Varanasi Stadium: त्रिशूळ, डमरू अन्…; वाराणसीत पंतप्रधान मोदी आज करणार स्टेडियमची पायाभरणी, क्रिकेटचे दिग्गजांना आमंत्रण

आशियाई क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ कोणत्या स्टेडियममध्ये होणार आहे?

आशियाई खेळ २०२३चा उद्घाटन सोहळा हांगझाऊ ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर स्टेडियमवर होणार आहे. या स्टेडियमचे काम २०१८ मध्ये पूर्ण झाले, सुमारे ८०,००० प्रेक्षक बसण्याची व्यवस्था आहे. उद्घाटन समारंभ व्यतिरिक्त, या स्टेडियममध्ये आगामी फुटबॉल सामने आयोजित केले जातील.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात चिनी संस्कृतीचे सादरीकरण होणार आहे. नेत्रदीपक इलेक्ट्रॉनिक फटाके देखील असतील. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील हा पहिला डिजिटल प्रज्वलन सोहळा असेल. आशियाई क्रीडा २०२३च्या उद्घाटन समारंभाला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग देखील उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा: KL Rahul: पहिल्या वन डेत कांगारूंना धूळ चारल्यानंतर के.एल. राहुलचे मोठे विधान; म्हणाला, “ही माझी पहिलीच वेळ…”

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक

२०२३आशियाई खेळांमध्ये सहभागी होणारे खेळाडू २०२४ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतात. भारताने आशियाई खेळांसाठी ६५५ खेळाडू पाठवले असून, ३९ खेळांमध्ये भाग घेतला आहे. पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि बॉक्सर लव्हलिना बोर्गोहाइन हे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचे ध्वजवाहक असतील.

आशियाई खेळांचा उद्घाटन सोहळा भारतात किती वाजता सुरू होईल?

आशियाई क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ २३ सप्टेंबर रोजी हांगझाऊ ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर स्टेडियमवर होणार आहे. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५.३० वाजता सुरू होईल.

आशियाई क्रीडा स्पर्धा भारतात कुठे प्रसारित आणि थेट प्रसारित केल्या जातील?

आशियाई क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर भारतात थेट प्रसारित केला जाईल. थेट प्रवाह Sony LIV अॅपवर असेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian games opening ceremony asian games opening ceremony today know time venue live streaming details avw