आशियाई क्रीडा स्पर्धा काही दिवसांवर आली आहे. या स्पर्धेसाठी संभाव्य पदक विजेत्यांच्या तयारीकडे लक्ष केंद्रित करण्याला प्राधान्य असल्याचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी सांगितले.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक प्राप्त सायना नेहवालने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर गोपीचंद यांना सोडून बंगळुरू येथील प्रकाश पदुकोण अकादमीत विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याचा निर्णय घेतला. पंधरा दिवसांसाठीचा हा निर्णय भविष्यातील सायना-गोपीचंद युती तुटण्याची नांदी तर नाही अशा चर्चाना उधाण आले आहे.
आता सिंधूच्या तयारीवर लक्ष देणे आवश्यक आहे. जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत तिने शानदार खेळ केला. हा आठवडा तिला देणे आवश्यक आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेला खुप कमी दिवस शिल्लक आहेत. सर्व बॅडमिंटनपटूंची कामगिरी चांगली व्हावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या सगळ्यांच्या सरावावर लक्ष केंद्रित केले आहे असे सांगत गोपीचंद यांनी सायनाच्या बंगळुरूत सराव करण्यावर काहीही बोलण्यास नकार दिला.
ते पुढे म्हणाले, ‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत स्पर्धा चुरशीची होती मात्र भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. सुधारणा आवश्यकच आहे मात्र कामगिरी वाईट नक्कीच नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय बॅडमिंटनपटूंसमोर आव्हान खडतरच आहे.

Story img Loader