ग्लासगो येथील राष्ट्रकुल स्पर्धेत मिळविलेल्या दहा पदकांची यशोमालिका आशियाई स्पध्रेतही राखण्याचे भारतीय वेटलिफ्टर्सचे ध्येय असून त्यादृष्टीनेच सुकेन डे व खुकुमचाम संजिता चानू यांच्या कामगिरीकडे शनिवारी लक्ष राहणार आहे. राष्ट्रकुलमध्ये पदक मिळविलेल्या खेळाडूंपैकी सात खेळाडूंना भारताने आशियाई स्पर्धेत संधी दिली आहे. त्यांच्यासह एकूण १० खेळाडूंचे पथक भारताने उतरविले आहे. पुरुषांच्या ५६ किलो गटात सुकेन याच्यावर भारताची मोठी भिस्त आहे. त्याने ग्लासगो येथे सोनेरी कामगिरी केली होती. महिलांच्या ४८ किलो गटात चानू हिने सुवर्णपदकाची कमाई केली होती, असे भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षक हंसा शर्मा यांनी सांगितले.

Story img Loader