१८ ऑक्टोबरपासून ओमानमध्ये सुरु होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या वेळापत्रकाची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. आशियाई हॉकी परिषदेने या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलेलं असून भारताची सलामीची लढत यजमान ओमानशी होणार आहे. १८ ते २८ ऑक्टोबरदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत भारतासह मलेशिया, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, जपान आणि ओमान हे संघ सहभागी होणार आहेत. नोव्हेंबर महिन्या भुवनेश्वरमध्ये पार पडणाऱ्या हॉकी विश्वचषकाआधी ही स्पर्धा उपयोगी ठरणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारतीय संघाचे सामने पुढीलप्रमाणे –
१८ ऑक्टोबर – भारत विरुद्ध ओमान
२० ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
२१ ऑक्टोबर – भारत विरुद्ध जपान
२३ ऑक्टोबर – भारत विरुद्ध मलेशिया
२४ ऑक्टोबर – भारत विरुद्ध दक्षिण कोरिया
२७ ऑक्टोबर – दोन उपांत्य फेरीचे सामने व ५-६ क्रमांकासाठीचा सामना
२८ ऑक्टोबर – ३-४ स्थानाकरता व अंतिम सामना