भरपूर सरावाच्या पाश्र्वभूमीवर आशियाई महिला बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याची खात्री होती. मात्र फाजील आत्मविश्वास न ठेवता खेळल्यामुळेच मी हे स्वप्न साकार करू शकले, असे ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णीने सांगितले.

गोव्याच्या भक्तीने ताश्कंद येथे नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत सहज विजेतेपद मिळवले. तिची आता जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रथमच तिला जागतिक स्पर्धेची संधी मिळाली आहे.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
Success Story Of Chitraang Murdia
Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Natasa Stankovic reacts On Divorce From Hardik Pandya
घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच नताशा हार्दिक पंड्याबाबत म्हणाली, “आम्ही अजूनही…”

आशियाई स्पर्धेच्या विजेतेपदाची खात्री होती काय, असे विचारले असता भक्ती म्हणाली, ‘‘या स्पर्धेपूर्वी मी मुंबई व नाशिक येथे मानांकन स्पर्धेत भाग घेतला होता. तेथील अनुभवाचा फायदा मला झाला. तसेच आशियाई स्पर्धेसाठी मी भरपूर मेहनत घेतली होती. तेथे चौथ्या फेरीत मला आघाडी मिळाली व ती मी शेवटपर्यंत टिकविली. अर्थात, तरीही शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये थोडेसे दडपण होते. मात्र आपल्याला विजेतेपद मिळवायचे आहे, हे ध्येय डोळय़ांसमोर ठेवत मी खेळले व त्यामुळे या फेऱ्यांमध्येही मी वर्चस्व राखू शकले.’’

भक्तीने या स्पर्धेत अग्रमानांकित सारा सदातवर मात केली. त्याविषयी भक्ती म्हणाली, ‘‘तिच्याविरुद्ध खेळताना माझ्यावर कोणतेही दडपण नव्हते. खरे तर तिला पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याचा फायदा मिळणार होता. मात्र मी तिच्या खेळाचा अभ्यास केला होता. त्यामुळे तिच्याकडून केव्हा चुकीची चाल होते याचीच मी वाट पाहत होते. माझ्या अपेक्षेप्रमाणे तिने नकळत एक चूक केली व तेथूनच मी डावावर नियंत्रण मिळवत विजय खेचून आणला.’’

ती पुढे भक्ती म्हणाली, ‘‘विजेतेपदाचे श्रेय द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले व माझ्या आई-वडिलांना द्यावे लागेल. माझे वडील प्रदीप यांनीच मला वयाच्या तिसऱ्या वर्षी बुद्धिबळ खेळावयास शिकवले. तेव्हापासून मी सतत खेळतच आहे. स्पर्धात्मक प्रशिक्षण मी रघुनंदन यांच्याकडून घेत असते. प्रत्येक महत्त्वाच्या स्पर्धाच्या वेळी ते माझ्याकडून भरपूर गृहपाठ करून घेतात. ’’

जागतिक स्पर्धेविषयी भक्ती म्हणाली, ‘‘या स्पर्धेत मी प्रथमच सहभागी होणार आहे. यंदा रशिया व चीनच्या खेळाडूंचे आव्हान असणार आहे. सध्या मी दररोज चार ते पाच तास सराव करते. जागतिक स्पर्धेसाठी जास्त वेळ सराव करण्याचा प्रयत्न असेल. गॅरी कास्पारोव्ह, विश्वनाथन आनंद, मॅग्नस कार्लसन हे माझे आदर्श आहेत. त्यांच्याप्रमाणे जागतिक स्तरावर ठसा उमटवण्याचे माझे ध्येय आहे. अर्थात, त्यासाठी खूप मेहनत करण्याची माझी तयारी आहे.’’

भक्ती अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत

भक्तीने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविले आहे, मात्र अद्याप ती नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. बुद्धिबळाची लोकप्रियता वाढली आहे व प्रायोजकही वाढत आहेत. त्यामुळे लवकरच आपल्याला नोकरी मिळेल, असा विश्वास भक्तीने व्यक्त केला.