Rinku Singh said I don’t have a girlfriend: आयपीएलच्या १६ व्या हंगामात सलग ५ चेंडूवर षटकार मारणाऱ्या रिंकू सिंगला आज कोणाच्याही परिचयाची गरज नाही. कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या या युवा फलंदाजाने भविष्यकाळ आपलाच असल्याचे दाखवून दिले आहे. पण रिंकू सिंगला गर्लफ्रेंड आहे का? याचे उत्तर उत्तर प्रदेशच्या या खेळाडूने दिले आहे. रिंकू सिंगसाठी आयपीएल २०२३ चा हंगाम शानदार राहिला. त्याने केकेआर संघासाठी फिनिशरची भूमिका उत्तम प्रकारे पार पाडली. आता तो टीम इंडियाचा दरवाजा ठोठावत आहे.
रिंकू सिंगने काही काळापूर्वी सोशल मीडियावर स्वतःचा एक शर्टलेस फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो सिक्स पॅक अॅब्स दाखवताना दिसत होता. हा फोटो लोकांना विशेषत: मुलींना खूप आवडला. यानंतर एनडीटीव्हीच्या कॉन्क्लेव्हमध्ये, जेव्हा रिंकू सिंगला विचारले गेले की त्याची गर्लफ्रेंड आहे का? तेव्हा रिंकू हसत म्हणाला, “नाही, मी आता सिंगल आहे”.
भारतीय टी-२० संघात संधी मिळू शकते –
२५ वर्षीय रिंकू सिंगने आयपीएल २०२३ मध्ये १४९.५३ च्या स्ट्राइक रेटने ४७४ धावा केल्या. आपल्या या चमकदार कामगिरीच्या जोरावर रिंकू टीम इंडियाच्या दरवाज्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, तीन वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. यापैकी टी-२० साठी रिंकूची भारतीय संघात निवड केली जाऊ शकते.
सफाई कामगारा म्हणून रिंकू सिंग करायचा काम –
आपल्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना रिंकू म्हणाला, “माझा भाऊ कोचिंग सेंटरमध्ये काम करायचा. त्यांनी मला तिथे सफाई कामगाराची नोकरी मिळवून दिली होती. ज्यासाठी मला क्रिकेट सोडावे लागले, तिथे साफ-सफाई करणे हे माझे काम होते. मात्र, नंतर मी माझ्या आईला पटवून दिले की खेळात सुधारणा करून मी आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारू शकतो.” वयाच्या १६ व्या वर्षी रिंकूचा उत्तर प्रदेश संघात समावेश करण्यात आला. त्याला २०१४ मध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.