वाढत्या वयानूसार महेंद्रसिंह धोनीच्या खेळावर टीका करणाऱ्यांना प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी चांगलच फटकारलं आहे. जे माजी खेळाडू धोनीवर टिका करत आहेत, त्यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी आपण काय करत होतो हे एकदा पहावं. वयाच्या ३६ व्या वर्षीही महेंद्रसिंह धोनी आपल्यापेक्षा १० वर्ष लहान खेळाडूंइतकाच तंदुरुस्त असल्याचं रवी शास्त्री यांनी म्हणलंय. ‘इंडिया टुडे’ ला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री बोलत होते.

अवश्य वाचा – ‘विराट कोहलीच टीम इंडियाचा बॉस’

चॅम्पियन्स करंडकात महेंद्रसिंह धोनीच्या कामगिरीवर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. मात्र श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत धोनीने फलंदाजी आणि यष्टीरक्षणात आपली चुणूक दाखवून दिली होती. यावेळी निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी २०१९ च्या विश्वचषकापर्यंत धोनीच संघाचा यष्टीरक्षक म्हणून कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

अवश्य वाचा – २०१९ पर्यंत महेंद्रसिंह धोनीचं संघातलं स्थान अबाधित !

धोनीच्या खेळाचं कौतुक करताना रवी शास्त्री म्हणाले, “जे खेळाडू धोनीवर टीका करत आहेत त्यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी आपण काय करत होतो हे एकदा आठवून बघावं. ज्या पद्धतीने धोनी धाव घेताना पळतो, तितके आपण पळू शकत होतो का? त्यामुळे आताच्या घडीला धोनीची जागा घेईल असा एकही खेळाडू भारतात नसल्याचं”, रवी शास्त्री यांनी स्पष्ट केलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीच्या तोडीचा यष्टीरक्षक सापडणार नाही असंही शास्त्री म्हणाले.

अवश्य वाचा – सरत्या वर्षाचा गोड शेवट ! भारताची श्रीलंकेवर ५ गडी राखून मात, मालिकाही खिशात

Story img Loader