भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि इशांत शर्मा हे क्रिकेटच्या सुरुवातीच्या दिवसांपासून जवळचे मित्र आहेत. दोघे अंडर-१७ दिवसांपासून एकत्र खेळत आहेत आणि त्यांनी दिल्ली तसेच भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, इशांतने कोहलीच्या कारकिर्दीतील चढ-उतार पाहिले आहेत. नुकत्याच झालेल्या संवादात, इशांतने कोहलीला पहिल्यांदा भेटल्यानंतरचा किस्सा उघड केला आहे. सध्या भारतीय संघातून बाहेर पडलेल्या या वेगवान गोलंदाजाने खुलासा केला की दिल्ली अंडर-१७ च्या शिबिरात तो प्रथम कोहलीला भेटला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

३४ वर्षीय खेळाडूला आठवते की चाचणी सामन्यादरम्यान कोहलीने त्याला क्लीनर्सकडे नेले होते आणि त्यानंतर तो कसातरी दिल्ली अंडर-१७ संघात निवडला गेला. इशांत शर्मा ‘बीअर बायसेप्स’ पॉडकास्टवर बोलताना म्हणतो, “दिल्ली अंडर-१७च्या चाचण्यांदरम्यान मी त्याला पहिल्यांदा भेटलो. मला एक लहान लोअर घातलेला मुलगा आठवतो. तो याआधीही भारत अंडर-१९ खेळला होता त्यामुळे मी त्याचे नाव खूप ऐकले होते. यावेळी सगळे त्याला ‘वीरू’ म्हणायचे. आमचा सामना पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीमध्ये होता आणि त्याने त्या सामन्यात मला खूप कुटले होते. नजफगडमध्ये खेळपट्टी रस्त्याप्रमाणे सपाट होती आणि विराटने त्या गोष्टीचा पूर्ण फायदा उचलला होता.”

हेही वाचा: Cheteshwar Pujara: टीम इंडियातून वगळल्याने पुजाराच्या वडिलांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “३५ वर्षाचा माझा मुलगा देशासाठी…”

भारताच्या माजी कर्णधाराशी झालेल्या पहिल्या संवादात, इशांत शर्माला त्याच्या आकारापेक्षा कमी आकाराची लोअर खरेदी करण्यास सांगितले. याबाबतीत बोलताना तो पुढे म्हणाला.”मी कसा तरी अंडर-१७ चाचण्यांसाठी निवडला गेलो. तिथे मी विराटला प्रत्यक्ष भेटलो. त्याने गंमतीने मला ‘भाई लोअर तो लेले अपने साइज का’ (तुमच्या आकारापेक्षा कमी आकाराची लोअर खरेदी करा) असे सांगितले. त्यावेळी मी खूप लाजलो होतो, इतरांशी संवाद कसा साधावा हे कळत नव्हते. मला माहित नव्हते की दिल्ली अंडर-१७  खेळणे किती मोठे आहे. माझे वडील नेहमी म्हणायचे किमान रणजी ट्रॉफीमध्ये जाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला सरकारी नोकरी मिळेल. कोणालाही वाटत नव्हते की मी एक दिवस पुढे जाऊन टीम इंडियाकडून खेळेल.”

हेही वाचा: Harbhajan Singh: “कदर करो हमारी खामोशी की…” हरभजन सिंगने सोशल मीडियावर केली एक गूढ पोस्ट शेअर

विराट कोहली हा भारतीय संघाचा तिन्ही फॉरमॅटचा प्रमुख खेळाडू आहे. कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत १०९ कसोटी, २७४ एकदिवसीय आणि ११५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ८४७९ धावा, एकदिवसीय सामन्यात १२८९८ धावा आणि टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ४००८ धावा केल्या आहेत. यादरम्यान तत्याने एकूण ७५ शतके झळकली आहेत. कोहली आणि उर्वरित भारतीय खेळाडू सध्या विश्रांती घेत आहे. टीम इंडिया पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिजमध्ये खेळताना दिसेल.