आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सला हरवल्यामुळे राजस्थान रॉयल्सचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. आता हीच विजयी घोडदौड कायम राखण्याच्या प्रेरणेने राजस्थानची चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या ‘अ’ गटात बुधवारी हायव्हेल्ड लायन्सशी गाठ पडणार आहे.
सवाई मानसिंग स्टेडियम हे राजस्थानसाठी यशदायी ठरते. आयपीएलच्या सहाव्या मोसमापासून राजस्थानच्या या मैदानावरील विजयरथाने आता नऊ सलग विजय त्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. यंदाच्या आयपीएल हंगामाला स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाने वादग्रस्त बनवले होते. परंतु त्या साऱ्या घटनांना मागे टाकून राजस्थानचा संघ आत्मविश्वासाने उभा राहिला आहे. कागदावरील संघांची तुलना केल्यास दक्षिण आफ्रिकेच्या लायन्सपेक्षा राजस्थानचे पारडे जड आहे.
वेळ : रात्री ८ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट, स्टार स्पोर्ट्स-२

Story img Loader