फर्नाडो टोरेसने अ‍ॅटलेटिको माद्रिदसाठी गेल्या आठ वर्षांनंतरचा पहिला गोल करीत रिअल माद्रिदचे कोपा डेल रे (किंग्ज चषक) फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. सान्तिआगो बेर्नबाऊ स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अ‍ॅटलेटिको माद्रिदने रिअल माद्रिदविरुद्ध २-२ अशी बरोबरी पत्करली. पण गेल्या आठवडय़ात पहिल्या टप्प्यातील सामन्यात २-० असा विजय मिळवल्यामुळे अ‍ॅटलेटिको माद्रिदने ४-२ अशा फरकाने ही लढत जिंकली. आता उपांत्यपूर्व फेरीत अ‍ॅटलेटिकोचा सामना बार्सिलोनाशी होईल.

Story img Loader