Athiya Shetty disappointed after Shreyas Iyer’s catch out: गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील ३३ वा सामना भारत आणि श्रीलंका संघात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. दरम्यान श्रीलंकेविरुद्ध श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी केली. टीम इंडियासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने १४६.४२ च्या स्ट्राइक रेटने ५६ चेंडूत ८१ धावांचे स्फोटक अर्धशतक झळकावले. सामन्यादरम्यान एके काळी तो आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील चौथे शतक पूर्ण करेल असे वाटत होते, पण वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात तो दिलशान मदुशंकाचा बळी ठरला.

उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत असलेल्या अय्यरला बाद झाल्यानंतर भारतीय चाहते खूपच निराश दिसले. इतकेच नाही तर भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचलेली केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टीही अय्यर बाद झाल्यानंतर खूपच निराश दिसली. अभिनेत्री अथिया शेट्टी निराश झाल्याचा काही सेकंदाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तिची निराशा स्पष्टपणे दिसून येते.

Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल

अय्यरने विश्वचषक २०२३ चे झळकावले दुसरे अर्धशतक –

श्रेयस अय्यरने आतापर्यंत भारतासाठी २०२३ च्या विश्वचषकातील सर्व सामन्यांमध्ये भाग घेण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, सात सामन्यांच्या सात डावांत त्याच्या बॅटमधून २१६ धावा झाल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध खेळली गेलेली खेळी ही त्याची विश्वचषक २०२३ मधील सर्वोच्च खेळी आहे. यापूर्वी त्याने पाकिस्तानविरुद्ध नाबाद ५३ धावा केल्या होत्या. अय्यरने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण दोन अर्धशतके झळकावली आहेत.

विश्वचषक २०२३ मध्ये अय्यरने खेळलेले एकूण डाव –

० धावा – विरुद्ध ऑस्ट्रेलिया चेन्नई
२५* धावा – विरुद्ध अफगाणिस्तान – दिल्ली
५३* धावा – विरुद्ध पाकिस्तान – अहमदाबाद
१९ धावा – विरुद्ध बांगलादेश – पुणे<br>३३ धावा – विरुद्ध न्यूझीलंड – धरमशाला
४ धावा – विरुद्ध इंग्लंड – लखनऊ
८२ धावा – विरुद्ध श्रीलंका – मुंबई</p>