तो जिंकेल, तो विजयपथावर परतेल, त्याला सूर गवसेल या साऱ्या अपेक्षा केवळ मनातच राहिल्याचं शल्य रॉजर फेडररच्या चाहत्यांना वर्षअखेरीस होणाऱ्या प्रतिष्ठेच्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्समध्येही अनुभवायला मिळालं. गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचने सहा वेळा या स्पर्धेचे जेतेपद नावावर करणाऱ्या फेडररवर ६-४, ६-७ (२), ६-२ अशी मात केली. या विजयामुळे जोकोव्हिचला पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याची संधी प्राप्त झाली आहे.
दरम्यान, राफेल नदालने स्टॅनिसलॉस वॉवरिन्कावर विजय मिळवत जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले. संघर्षपूर्ण लढतीत त्याने स्वित्र्झलडच्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्कावर ७-६ (५), ७-६ (६) अशी मात केली.

Story img Loader