Auctioneer Mallika Sagar’s Big mistake : आयपीएल २०२४ साठीचा मिनी लिलाव दुबईत पार पडला. या लिलावात काही रेकॉर्डब्रेक बोली पाहायला मिळाल्या. यानंतर उत्साह शिगेला पोहोचला होता. आयपीएलची लिलावकर्ता म्हणून महिला पाहण्याची ही पहिलीच वेळ होती. मल्लिका सागर ही दुबईतील आयपीएल २०२४ची लिलावकर्ता होती. तिने आपल्या पहिल्याच लिलावात मोठी चूक केली, त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मोठे नुकसान झाले. लिलावात कॅरेबियन खेळाडू अल्झारी जोसेफसाठी तीन संघ लढत असताना ही घटना घडली.

वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू अल्झारी जोसेफ त्याच्या धारदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. अल्झारी जोसेफ आयपीएल २०२४ मध्ये एक कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह सामील झाला होता. या खेळाडूसाठी ४ संघांमध्ये रस्सीखेच पाहिला मिळाली, ज्यात सीएसके, आरसीबी, एलएसजी आणि डीसी या संघांचा समावेश होता. प्रथम चेन्नईने जोसेफवर बोली लावली आणि दिल्लीशी लढाई केली. मात्र बोली तीन कोटींवर पोहोचल्यानंतर धोनीच्या संघाने हार पत्करली. मात्र, तीन संघ ठाम राहिले. अखेर आरसीबीने जोसेफला ११.५० कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. पण बोली ६.४० कोटींवर पोहोचल्यावर लिलाव करणाऱ्या मल्लिका सागरकडून चूक झाली.

Robbery at sister house to play online gambling in Pimpri Pune print news
पिंपरी: पाच एकर जमीन विकून जुगारात हारला; ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
A group of people looking at stock market data on a screen.
Hindenburg : हिंडनबर्ग रिसर्च बंदची घोषणा अन् अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; BSE वर अदाणी पॉवर, ग्रीन एनर्जी तेजीत
Ravi Raja provided list of 30 big property tax defaulters to Municipal Commissioner
मोठ्या कंपन्या व विकासकांकडे कोट्यवधीचा मालमत्ता कर थकीत, एमएसआरडीसीने थकवला मालमत्ता कर
Stock market today BSE Sensex crashes over 1000 points
मुंबई शेअर बाजार हजार अंशांनी कोसळला; डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन विक्रमी नीचांकावर
Rupee sinks to record low, settles 66 paise down
रुपयाची दोन वर्षांतील सर्वांत मोठी गटांगळी
fraud with aqua marine global culture company
एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीची फसवणूक
उत्तर प्रदेशला ३१ हजार कोटी तर बिहारला १७ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याबद्दल कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
केंद्राकडून महाराष्ट्राला १०,९३० कोटी; उत्तर प्रदेश, बिहारला अधिक निधी दिल्यावरून टीका

इथेच चूक झाली…

यानंतर जेव्हा आरसीबीला बोली लावावी लागली तेव्हा मल्लिका सागरला ६.६० कोटींवरुन पुढे सुरुवात करायची होती. पण ब्रेकनंतर जेव्हा तिने बोलीला सुरुवात केली, तेव्हा तिने ६.८० कोटी रुपयांवर बोलीची सुरुवात केली. यानंतरही बोली सुरूच राहिली आणि अखेर आरसीबीने त्याला ११.५० कोटी रुपयांना विकत घेतले. मल्लिका सागरच्या या चुकीमुळे आरसीबीचे २० लाखांचे नुकसान झाले. कारण तिथे तिने ६ कोटी ६० लाख रुपयांवरुन बोलीला सुरुवात करायची होती, पण तिने ६.८० लाख पासून बोलीला सुरुवात केली.

हेही वाचा – IPL 2024 Auction : राइट हँडेड रैना असं म्हटलं जाणारा समीर रिझवी कोण आहे? जाणून घ्या

मल्लिकाने आयपीएलमध्ये इतिहास रचला –

मल्लिका सागरने आयपीएल २०२४ च्या लिलावात प्रवेश करून इतिहास रचला होता. तिने ह्यू एडमीड्सची जागा घेतली, जो बर्याच काळापासून प्रक्रियेचा भाग होता. गेल्या १६-१७ वर्षात पहिल्यांदाच एका महिला लिलावकर्तीकडून लिलावात बोली लावली गेली. हा ऐतिहासिक क्षण होता, पण तिच्या २० लाखांच्या चुकीमुळे मल्लिका सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. हळूहळू लिलाव पुढे नेण्यासाठी, त्याच्याबद्दलचे अनेक मीम्स व्हायरल झाले.

Story img Loader