India vs Australia 3rd Test: इंदोरमध्ये खेळल्या गेलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलिया संघाने ९ विकेट्सने जिंकला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होण्याची शक्यता आहे, कारण ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. तसेच भारतही फायनलमध्ये प्रवेश करण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियन संघाने ०-२ ने पिछाडीवर पडल्यानंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये तिसरा सामना जिंकून पुनरागमन केले आहे. इथून ऑस्ट्रेलिया मालिकेत बरोबरीही करू शकतो. तसेच भारताला मालिका २-१ किंवा ३-१ अशी जिंकण्याची संधी असेल. जर भारतीय संघाने अहमदाबादमध्ये खेळली जाणारी चौथी कसोटी जिंकली तर मालिकेची स्कोअर लाइन ३-१ असेल आणि अनिर्णित राहिल्यास स्कोअर लाइन २-१ अशी असेल.
डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाल्यास, २०२१-२३ सायकलमध्ये, ऑस्ट्रेलियाच्या संघाची तिसऱ्या सामन्यांनंतर विजयाची टक्केवारी ६८.५२ टक्के आहे. त्याचबरोबर भारताची विजयाची टक्केवारी पराभवानंतर ६०.२९ टक्क्यांवर आली आहे. श्रीलंकेचा संघ तिसर्या क्रमांकावर नक्कीच आहे. पण यावेळी त्यांची विजयाची टक्केवारी ५३.३३ टक्के आहे, तर दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी ५२.३८ टक्के आहे.
भारताच्या अडचणी वाढणार?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम सामन्याच्या दृष्टिकोनातून भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतीय संघ पुढचा सामना हरला तर समीकरण अधिकच गुंतागुंतेचे होईल. कारण त्यानंतर त्यांच्या हातात काहीच राहणार नाही. कारण भारताला न्यूझीलंड आणि श्रीलंका कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. ज्यामध्ये भारताला प्रार्थना करावी लागेल की, न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेला दोन्ही सामन्यात पराभूत करावे किंवा किमान मालिका १-० ने जिंकावी.
फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारत आणि श्रीलंकेत चुरस –
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत फक्त तीन संघ आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने आपले स्थान निश्चित केले आहे. अशा स्थितीत भारत आणि श्रीलंकेला अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. जर भारतीय संघ शेवटचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला, तर ते अंतिम फेरीत प्रवेश करतील. भारताचा पराभव झाल्यास त्यांना श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतील निर्णयावर अवलंबून राहावे लागेल.
हेही वाचा – IND vs AUS 3rd Test: ‘मला विश्वास बसत नाही की, विराट…’; कोहलीबाबत ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडचे मोठं वक्तव्य
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ फायनल जूनमध्ये होणार –
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ चा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. हा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला आहे. फायनल ७ ते ११ जून दरम्यान खेळवली जाईल, तर १२ जून हा स्पर्धेसाठी राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. न्यूझीलंड संघाने भारताचा पराभव केला होता.