Australia vs Afghanistan, World Cup 2023: विश्वचषक स्पर्धेतील ३९वा सामना ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे सात सामन्यांत मिळून १० गुण आहेत. त्यांनी पाच सामने जिंकले असून दोनमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानचे सात सामन्यांत मिळून आठ गुण आहेत. दोन्ही संघांची नजर उपांत्य फेरीकडे असणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत सापडला आहे. ग्लेन मॅक्सवेल आधीच जखमी असताना आता स्टीव्ह स्मिथ आजारी पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या पुढील आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही याबद्दल शंका आहे. त्याने त्याची तब्येत बिघडली असल्याचे उघड केले आहे. त्याला चक्कर येते असून थोडे अस्वस्थ वाटत आहे. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत स्मिथ म्हणाला, “गेल्या काही दिवसांपासून मला थोडे चक्कर येत आहे. शारीरिकदृष्ट्या त्यामुळे थोडा त्रास होत आहे. मला आशा आहे की मी सराव सत्रांमध्ये भाग घेईन आणि चांगले प्रदर्शन करू शकेन, परंतु सध्याची ही परिस्थिती चांगली नाही.”

हेही वाचा: BAN vs SL: अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट दिल्याने श्रीलंकेचे चाहते नाराज, क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याचे किती आहेत प्रकार? जाणून घ्या

पुढे स्मिथला विचारले की, तो सामना खेळण्यासाठी उपलब्ध असेल का? यावर स्मिथ म्हणाला की, “सराव सत्रात भाग घेतल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल.” ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा सामना होत आहे. विश्वचषकातील गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा वाढतील.

मॅक्सवेल आणि मार्शच्या उपलब्धतेबद्दल बोलताना स्मिथने खुलासा केला की, मार्श संघात परतला आहे आणि सराव सत्रात भाग घेणार आहे. मॅक्सवेलचा विचार करता तो सरावातही सहभागी होणार आहे. स्मिथ म्हणाला, “मार्श आला आहे आणि सराव सत्रात सहभागी होणार आहे. मॅक्सवेलही येथेच आहे. तो अफगाणिस्तानविरुद्ध खेळू शकेल की नाही याची मला कल्पना नाही.” भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.”

हेही वाचा: BAN vs SL: चारिथ असालंकाचे तुफानी शतक! श्रीलंकेने बांगलादेशसमोर विजयासाठी ठेवले २८० धावांचे आव्हान

विश्वचषक जसाजसा अंतिम टप्यात येत आहे तसतशी उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी संघांमध्ये अधिक चढाओढ लागली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ अगोदरच उपांत्य फेरीत पोहचले आहेत तसेच, ऑस्ट्रेलिया देखील जवळपास उपांत्य फेरीत पोहचल्यात जमा आहे. दुसरीकडे मात्र, चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात स्पर्धा सुरु आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aus vs afg big blow to australia ahead of afghanistan clash steve simith player likely to miss match avw