Glenn Maxwell 200 AUS vs AFG World Cup 2023: ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने वानखेडे न भूतो न भविष्यति अशी कामगिरी करत अविश्वसनीय द्विशतक ठोकले. एकट्या मॅक्सवेलने संपूर्ण अफगाणी संघाच्या नाकेनऊ आणत संघाला अफलातून विजय मिळवून दिला. मॅक्सवेल हा विश्वचषकाच्या सारख्या टुर्नामेंटमध्ये द्विशतक झळकावणारा तिसरा खेळाडू ठरला. मॅक्सवेलने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या द्विशतकासह मॅक्सवेलने ‘द-ग्रेट’ कपिल देव यांच्या वनडेतील मोठा विक्रम मोडला. त्याने कपिल यांच्या १९८३ विश्वचषकातील १७५ या खेळीला मागे टाकत मोठी कामगिरी केली आहे.
ग्लेन मॅक्सवेलने कपिल देव यांचा विक्रम मोडला
ग्लेन मॅक्सवेल विश्वचषक स्पर्धेत मधल्या फळीत पाचव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. मंगळवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यादरम्यान मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकाच्या फलंदाजाने सर्वोच्च धावसंख्याही नोंदवली.
कपिल देव यांनी १९८३मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडिया अडचणीत असताना अशीच खेळी करून संघाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला होता. त्यांची ही खेळी आयसीसीच्या इतिहासात अजरामर ठरली. त्याचीच पुनरावृत्ती ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने आज मुंबईत केली. या वर्ल्ड कपमध्ये तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. विश्वचषकातील सर्वात वेगवान शतकही त्याच्या बॅटने झळकले आहे. त्याने हे शतक ४० चेंडूत पूर्ण केले. मॅक्सवेल हा विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज आहे.
ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला
मुंबईतील वानखडे स्टेडियमवर आयसीसी विश्वचषक २०२३ च्या ३९व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना अफगाणिस्तानशी झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ५० षटकांत ५ गडी गमावून २९१ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली, मात्र ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती द्विशतकाच्या जोरावर कांगारूंनी ४६.५ षटकांत ३ गडी शिल्लक असताना लक्ष्य गाठले. ग्लेन मॅक्सवेलने १२८ चेंडूत २१ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने २०१ धावांची खेळी केली.
एकदिवसीय सामन्यांमध्ये मधल्या फळीत सर्वोच्च धावसंख्या करणारे खेळाडू
२०१* – ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध अफगाणिस्तान, मुंबई वानखेडे स्टेडियम, २०२३ विश्वचषक
१९४* – चार्ल्स कोव्हेंट्री (झिम्बाब्वे) विरुद्ध बांगलादेश, बुलावायो, २००९
१८९* – विव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज) विरुद्ध इंग्लंड, मँचेस्टर, १९८४
१८५ – फाफ डु प्लेसिस (एसए) विरुद्ध एसएल, केप टाऊन, २०१७
१७५*- कपिल देव (भारत) विरुद्ध वेस्ट इंडीज, इंग्लंड, १९८३ (विश्वचषक)
मागील विश्वचषक विक्रम: १८१ – विव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज) विरुद्ध श्रीलंका, कराची, १९८७