Ibrahim Zadran Century in World Cup 2023: अफगाणिस्तानच्या इब्राहिम जादरानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले. विश्वचषक २०२३ च्या ३९व्या सामन्यात इब्राहिमने १३१ चेंडूत शतक झळकावले. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे पाचवे शतक होते. त्याच वेळी, इब्राहिम एकदिवसीय विश्वचषकात शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला. याआधी, अफगाणिस्तानसाठी विश्वचषकातील सर्वोत्तम खेळी समिउल्लाह शिनवारीची होती, त्याने २०१५ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध 96 धावांची खेळी केली होती. इब्राहिमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४३ चेंडूत १२९ धावांची नाबाद खेळी खेळली.
अफगाणिस्तानसाठी विश्वचषकातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
१२९* – इब्राहिम जादरान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मुंबई, २०२३
९६ – समिउल्ला शिनवारी विरुद्ध स्कॉटलंड, ड्युनेडिन, २०१५
८७ – इब्राहिम झद्रान विरुद्ध पाकिस्तान, चेन्नई, २०२३
८६ – इकराम अलीखिल विरुद्ध वेस्ट इंडिज, लीड्स, २०१९
८० – हशमतुल्ला शाहिदी विरुद्ध भारत, दिल्ली, २०२३
८० – रहमानउल्ला गुरबाज विरुद्ध इंग्लंड, दिल्ली, २०२३
अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके
६- मोहम्मद शहजाद
५ – रहमानउल्ला गुरबाज
५- रहमत शाह
५ – इब्राहिम जादरान
इब्राहिम हा चौथा सर्वात तरुण खेळाडू आहे
अफगाणिस्तानकडून सर्वाधिक शतके झळकावणाऱ्यांमध्ये इब्राहिम संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याआधी रहमानउल्ला गुरबाज आणि रहमत शाह यांनी प्रत्येकी पाच शतके ठोकली आहेत. अफगाणिस्तानसाठी मोहम्मद शहजादने सर्वाधिक शतके झळकावली आहेत. त्याच्या नावावर सहा शतके आहेत. विश्वचषकात शतक झळकावणारा इब्राहिम हा चौथा सर्वात तरुण खेळाडू आहे. या सामन्यापर्यंत त्याचे वय २१ वर्षे ३३० दिवस होते. वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणजे आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग. २०११च्या कोलकाता विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्ध त्याने वयाच्या २० वर्षे १९६ दिवसाचा असताना त्याने शतक झळकावले होते.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा इब्राहिम हा चौथा सर्वात तरुण खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात कमी वयात वन डे शतक ठोकण्याचा विक्रम बांगलादेशचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अश्रफुलच्या नावावर आहे. अश्रफुलने २००५ मध्ये कार्डिफमध्ये कांगारूंविरुद्ध वयाच्या २० वर्षे २८२ दिवसांत शतक झळकावले होते.
एकदिवसीय विश्वचषकात शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू
२० वर्षे १९६ दिवस: पॉल स्टर्लिंग (आयर्लंड) विरुद्ध नेदरलँड, कोलकाता, २०११
२१ वर्षे ७६ दिवस: रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध वेस्ट इंडिज, जयपूर, १९९६
२१ वर्षे ८७ दिवस: अविष्का फर्नांडो (श्रीलंका) विरुद्ध वेस्ट इंडीज, चेस्टर-ले-स्ट्रीट, २०१९
२१ वर्षे ३३०: इब्राहिम जादरान (अफगाणिस्तान) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मुंबई, २०२३
२२ वर्षे १०६ दिवस: विराट कोहली (भारत) विरुद्ध बांगलादेश, मीरपूर, २०११
२२ वर्षे ३०० दिवस: सचिन तेंडुलकर (भारत) विरुद्ध केनिया, कटक, १९९६
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू
२० वर्षे २८२ दिवस – मोहम्मद अश्रफुल (बांगलादेश), कार्डिफ, २००५
२१ वर्षे १३८ दिवस – सचिन तेंडुलकर (भारत), कोलंबो, १९९४
२१ वर्षे ३०९ दिवस – डेव्हिड गोवर (इंग्लंड), मेलबर्न, १९७९
२१ वर्षे ३३० दिवस – इब्राहिम जादरान (अफगाणिस्तान), मुंबई, २०२३ (विश्वचषक)
२१ वर्षे ३४१ दिवस – क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका), सिडनी, २०१४
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानने ५० षटकांत ५ गडी गमावून २९१ धावा केल्या. विश्वचषकाच्या इतिहासातील ही अफगाणिस्तानची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानने या सामन्यात नऊ षटकार ठोकले. विश्वचषकातील एका सामन्यात अफगाणिस्तानने मारलेला हा सर्वाधिक षटकार आहे.
अफगाणिस्तानच्या विश्वचषकातील सर्वोच्च संघाची धावसंख्या
२९१/५ वि ऑस्ट्रेलिया, मुंबई, २०२३
२८८ वि वेस्ट इंडीज, लीड्स, २०१९
२८६/२ वि पाकिस्तान, चेन्नई, २०२३
२८४ वि इंग्लंड, दिल्ली, २०२३
२७२/८ वि भारत, दिल्ली, २०२३
अफगाणिस्तानसाठी विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक षटकार
९ वि ऑस्ट्रेलिया, मुंबई, २०२३
८ वि. इंग्लंड, मँचेस्टर, २०१९
८ वि. इंग्लंड, दिल्ली, २०२३
७ वि ऑस्ट्रेलिया, ब्रिस्टल, २०१९
७ वि भारत, दिल्ली, २०२३