Australia vs Afghanistan, World Cup 2023: वानखेडेमध्ये ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी द्विशतकामुळे ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेतला. विश्वचषक २०२३मध्ये अफगाणिस्तानने पाचवेळच्या वर्ल्डकप चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले होते. मात्र, मॅक्सवेलने तुफानी द्विशतकी खेळी करत संघाला तीन गडी राखून विजय मिळवून दिला. या विजयाने ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. अफगाणी गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी एकीकडे गुडघे टेकलेले असताना दुसरीकडे, मॅक्सवेलने एक बाजू लावून धरत चौकार-षटकारांची आतिषबाजी सुरूच ठेवली. त्याला कर्णधार पॅट कमिन्सने चांगली साथ दिली.

वानखेडेमध्ये आज ग्लेन मॅक्सवेल नावाचे वादळ घोंघावले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला मॅक्सवेल म्हणाला, “तू फक्त उभा राहा आणि मला साथ दे…”,असे म्हणत त्याने एकहाती सामना जिंकवून दिला. एकवेळ अशी होती की कांगारूंच्या सात विकेट्स केवळ ९१ धावांत पडल्या होत्या. मात्र, अफगाणिस्तानने ग्लेन मॅक्सवेलचे चार झेल सोडत त्याला जीवदान दिले. पळून धावा काढताना त्रास होत होता तरीही त्याने हार मानली नाही आणि द्विशतक करत ऑस्ट्रेलियाला अविश्वसनीय असा विजय मिळवून दिला. अफगाणिस्तान जरी आज पराभूत झाला असला तरी त्यांच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा कायम आहेत. अफगाणिस्तानच्या पराभवाने न्यूझीलंड आणि पाकिस्तानची उपांत्य फेरीत जाण्याची वाट काही प्रमाणात सुकर झाली आहे.

South Africa vs Afghanistan, T20 World Cup semi-final
T20 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेला अफगाणिस्तान रोखणार?उपांत्य फेरीच्या लढतीत आज आमनेसामने
taliban minister talk to rashid khan
T20 World Cup : रशीद खानच्या शिलेदारांचं तालिबानी नेत्याने केलं कौतुक; अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केला व्हिडीओ
Team Afghanistan Celebrating Their Historic Victory Against Australia
AUS vs AFG : अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर ब्राव्होने केला ‘चाम्पिअन वाला डान्स’, बसमधील संघाचा VIDEO व्हायरल
AUS vs AFG match memes viral on social media
VIDEO : अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर मीम्सचा महापूर, नेटकऱ्यांनी मॅक्सवेलची अंडरडेकरशी केली तुलना
Afghanistan win complicates Group-1 equation
AUS vs AFG : अफगाणिस्तानचा विजय ऑस्ट्रेलियाच्या मुळावर? टीम इंडिया सेमी फायनलमध्ये जाणार? काय झालंय नेमकं समीकरण?
Glenn Maxwell catch by Noor Ahmed in the Gulbadin Naib over
AFG vs AUS : ग्लेन मॅक्सवेलचा झेल ठरला अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयाचा ‘टर्निंग पॉइंट’, VIDEO होतोय व्हायरल
France is worried about captain Kylian Mbappe injury
फ्रान्सला एम्बापेच्या दुखापतीची चिंता; सलामीच्या लढतीत ऑस्ट्रियावरील विजयात नाकाला दुखापत
Australia defeated Scotland in Twenty20 World Cup cricket match sport news
ऑस्ट्रेलियाचा विजय, इंग्लंड ‘अव्वल आठ’मध्ये

ऑस्ट्रेलियाने तीन गडी राखून विजय मिळवला

ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह ऑसी संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया हा तिसरा संघ ठरला आहे. आता चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत २९१ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने सात गड्यांच्या मोबदल्यात २९३ धावा केल्या आणि सामना जिंकला.

ऑस्ट्रेलियाने ९१ धावांत सात विकेट गमावल्या होत्या. यानंतर मॅक्सवेलने पॅट कमिन्ससोबत २०२ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. या विश्वचषकातील हे पहिलेच द्विशतक होते. नवीन-उल-हकने त्याच्या पहिल्या दोन षटकांत ट्रॅव्हीस हेड (०) व मिचेल मार्शला (२४) माघारी पाठवले. अझमतुल्लाह ओमारजाईने सलग दोन चेंडूमध्ये डेव्हिड वॉर्नर (१८) आणि जॉश इंग्लिसला बाद केले. मार्नस लाबुशेन (१४) रन आऊट झाला. मार्कस स्टॉयनिस (६) व मिचेल स्टार्क (३) हे राशिद खानचे बळी ठरले.

अफगाणिस्तानचा डाव

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. रहमानउल्ला गुरबाज २५ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. यानंतर रहमत शाह आणि इब्राहिम जादरान यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. रहमत ३० धावा करून मॅक्सवेलच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर इब्राहिमने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीबरोबर तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची अप्रतिम भागीदारी केली. शाहिदीने फक्त २६ धावा करू शकला. अजमतुल्ला उमरझाईही २२ धावा करून बाद झाला, त्याच्या पाठोपाठ मोहम्मद नबीही अवघ्या १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान, इब्राहिमने वन डे कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने दोन विकेट्स घेतल्या. त्याला मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अ‍ॅडम झाम्पा यांना प्रत्येकी एक विकेट घेत मदत केली.