Australia vs Bangladesh ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ४३व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना बांगलादेशशी होत आहे. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम पुणे येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने तौहीद हृदोयच्या अर्धशतकाच्या जोरावर ५० षटकांत ८ गडी गमावून ३०६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियासमोर ३०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ५० षटकांत ८ गडी गमावून ३०६ धावा केल्या. बांगलादेशकडूनतौहीद हृदयीने सर्वाधिक धावांची खेळी केली. त्याने ७९ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. यात ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. तर कर्णधार नजमुल शांतोने ४५ धावा केल्या. याशिवाय तनजीद हसनने आणि लिटन दासने प्रत्येकी ३६ धावा केल्या. त्याचबरोबर महमुदुल्लाहने ३२ धावा, मुशफिकुर रहीमने २१ धावा, मेहदी हसन मिराजने २९ धावा आणि नसुम अहमदने ७ धावा केल्या. महेदी हसन २ धावांवर तर तस्किन अहमद शून्यावर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून शॉन अॅबॉट आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तसेच मार्कस स्टॉइनिसला एक विकेट मिळाली.

हेही वाचा – Time Out Controversy: “पंच मला म्हणाले होते तू…”; टाईम आऊट वादावर प्रतिक्रिया देताना आश्विनने सांगितला ‘तो’ किस्सा

ऑस्ट्रेलियन संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे पहिले दोन सामने गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत सलग सहा सामने जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचबरोबर बांगलादेश आठपैकी सहा सामने गमावून विश्वचषकातून बाहेर पडला असला, तरी या संघाचे लक्ष्य चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्थान मिळवण्याचे आहे.