AUS vs ENG Match Updates in Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करत असून मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्स कॅरीच्या एकापेक्षा एक कमाल तीन झेलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

इंग्लंडने ४० षटकांत ४ विकेट्स गमावले आहेत, त्यापैकी ३ विकेट हे झेलबाद करून मिळवले. यामध्ये या तिन्ही कॅच ॲलेक्स कॅरीने टिपल्या. फिलिप सॉल्टचा झेल हवेत झेप घेत, जॅमी स्मिथचा एक साधा झेल, तर हॅरी ब्रुकला कॅरीने मागे धावत जात एक उत्कृष्ट झेल टिपला.

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सामन्यात स्फोटक फलंदाज फिल सॉल्ट बेन डकेटसह सलामीला आला. सॉल्टने इंग्लंडला दणक्यात सुरूवात करून दिली. पण तो दुसऱ्याच षटकात बाद झाला. सॉल्टने एक षटकार आणि एक चौकारासह १० धावा केल्या. पण, त्यानंतर ॲलेक्स कॅरीने त्याच्या मोठ्या खेळीवर लगाम लावला. डावाच्या ऑस्ट्रेलियन गोलंदाज बेन द्वारशुइसने त्याच्या पहिल्या षटकात फिल सॉल्टने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण मिडऑनला तो झेलबाद झाला आणि पहिल्याच षटकात विकेट मिळाली.

ॲलेक्स कॅरीने हवेत झेप घेत केवळ एका हाताने फिल सॉल्टचा झेल घेतला. कॅरीचा तो झेल असा होता की तो पाहून सगळेच थक्क झाले. खुद्द सॉल्टचाही यावर क्षणभर विश्वास बसेना. यानंतर सहाव्या षटकात द्वारशुईसला अजून एक विकेट मिळाली. मोठा फटका खेळण्यासाठी गेलेल्या जॅमी स्मिथचा ॲलेक्स कॅरीने शानदार झेल टिपला.

२ विकेट गेल्यानंतर जो रूट आणि बेन डकेटने १०० अधिक धावांची कमालीची भागीदारी रचत संघाला ३० षटकांत २०० धावांचा टप्पा गाठून दिला. बेन डकेटने शतक झळकावत इंग्लंडची धावसंख्या पुढे नेत आहे. जो रूटची विकेट गमावल्यानंतर मैदानावर आलेल्या हॅरी ब्रुकला मोठी खेळी करता आली नाही. कॅरीने मागे धावत जाऊन शानदार झेल टिपत ब्रुकला बाद केले.

Story img Loader