इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडने ५० षटकात ९ गडी गमावून २८७ धावा केल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅश्टन अॅगरने सीमारेषेवर धोकादायक षटकार रोखला. त्याची फिल्डिंग पाहून स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.
ऑस्ट्रेलियन संघाने टी२० विश्वचषकाच्या आधी इंग्लंडसोबत मायदेशात खेळलेल्या टी२० मालिकेत पराभव स्वीकारला होता. त्यानंतर विश्वचषकात देखील त्यांचा संघ अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. अशात एकदिवसीय मालिकेत चांगले प्रदर्शन करण्यासाठी ऑस्ट्रेलिया प्रयत्नशील आहे. गुरुवारी (१७ नोव्हेंबर) पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ चांगले प्रदर्शन करताना दिसला. यादरम्यान अॅश्टन अॅगर याने जबरदस्त क्षेत्ररक्षण संघासाठी षटकार रोखला.
ॲडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज डेव्हिड मलानने १३४ धावांची तुफानी खेळी केली. त्याने १२८ चेंडूंचा सामना केला. यादरम्यान १२ चौकार आणि ४ शानदार षटकारही आले. मालन वगळता इतर कोणताही फलंदाज इंग्लंडसाठी विशेष काही करू शकला नाही. यादरम्यान अॅश्टन अॅगर याने जबरदस्त क्षेत्ररक्षण करून संघासाठी एक षटकार रोखला. एगरने मैदानात दाखवलेल्या चपळाईसाठी त्याचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
अॅश्टन अॅगरने अप्रतिम क्षेत्ररक्षण केले
डेव्हिड मलान १३१ धावांवर फलंदाजी करत असताना त्याला पॅट कमिन्सचा चेंडू सीमापार पाठवायचा होता. यासाठी जेव्हा त्याने पुल शॉट मारला तेव्हा चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे जात होता, तेवढ्यात अॅश्टन अॅगर मध्यभागी आला आणि त्याने हवेत उडणारा चेंडू थांबवला आणि तो मैदानाच्या आत फेकला, त्याचवेळी तो स्वतः सीमारेषेच्या बाहेर पडला, पण संघासाठी. ५ धावा वाचवल्या. इंग्लंडच्या डावातील ४५व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ही घटना घडली.
अॅडम झाम्पाने ३ बळी घेतले
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि अॅडम झाम्पा यांनी शानदार गोलंदाजी केली. स्टार्कने १० षटकांत ४५ धावांत १ बळी घेतला, तर झाम्पाने ५५ धावांत ३० बळी घेतले. मार्कस स्टॉयनिसलाही एक विकेट मिळाली. आता हा सामना ऑस्ट्रेलियाला जिंकायचा असेल तर २८८ धावा कराव्या लागतील.