England vs Australia, World Cup 2023: सध्याच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. ऑस्ट्रेलिया विश्वचषकात उपांत्य फेरी गाठण्यासाठी जोरदार वाटचाल करत आहे, दुसरीकडे इंग्लंडचा संघ तळाशी आहे. आता शनिवारी (४ नोव्हेंबर) रोजी अॅशेस मालिकेतील दोन्ही जुने प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू इंग्लंडविरुद्ध खेळणार नाहीत त्यामुळे इंग्लिश संघाचे पारडे जड झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पाचवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाने त्यांच्या फलंदाजीच्या बळावर सलग चार विजय मिळवून त्यांनी खराब कामगिरीरून संघाला पुन्हा रुळावर आणले आहे. ते आठ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गतविजेत्या इंग्लंडला त्यांच्या फलंदाजांच्या अपयशामुळे चार पराभवांना सामोरे जावे लागले आहे. त्यांनी गेल्या तीन सामन्यांमध्ये १७० किंवा त्यापेक्षा कमी धावा केल्या आहेत. या सामन्यापूर्वी दोन्ही संघ वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहेत.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल या दोन महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत आजचा सामना खेळावा लागत आहे. वैयक्तिक कारणांमुळे मार्शला जरी मायदेशी परतावे लागले तरी, त्याला देखील थोडी दुखापत झाली आहे. दुसरीकडे, मॅक्सवेलला गोल्फ कार्टमधून पडल्याने डोक्याला दुखापत झाली. त्यांच्या अनुपस्थितीत कॅमेरून ग्रीन आणि मार्कस स्टॉयनिस शनिवारी संघात सामील होण्याची झाले आहेत.
इंग्लंडने विजयाच्या प्रयत्नात सर्व जोड्या आजमावून पाहिल्या आणि शनिवारच्या सामन्यासाठीही त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याच स्टेडियममध्ये झालेल्या सलामीच्या लढतीत संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. हॅरी ब्रूकचे पुनरागमन अपेक्षित आहे तर दुखापतग्रस्त रीस टॉपलीच्या जागी आलेला ब्रेडन कार्सही या सामन्यात खेळेल अशी अपेक्षा आहे. २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र होण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम खेळ करावा लागेल.
दोन संघांमधील आकडेवारी
विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघ नऊ वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने सहा तर इंग्लंडने तीन सामने जिंकले आहेत. जर आपण एकूण एकदिवसीय विक्रमांबद्दल बोललो तर दोन्ही संघांमध्ये १५५ सामने खेळले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाने ८७ तर इंग्लंडने ६३ सामने खेळले आहेत. दोन सामने टाय झाले आणि तीन सामन्यांचा निकाल लागला नाही.
ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजी करेन. ऑस्ट्रेलियाने संघात दोन बदल केले. कौटुंबिक कारणांमुळे मायदेशी परतलेले जखमी ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श यांच्या जागी कॅमेरून ग्रीन आणि मार्कस स्टॉयनिस यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, इंग्लंडने एकही बदल केला नाही.
दोन्ही संघांचे प्लेइंग-११
इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड.
ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.