AUS vs ENG Travis Head scored 30 runs in Sam Curran over : साउथॅम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा २८ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने १९.३ षटकांत सर्वबाद १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १९.२ षटकांत १५१ धावांवर गारद झाला. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने ५९ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याने सॅम करनच्या एकाच षटकात ३० धावांचा पाऊस पाडला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ट्रॅव्हिस हेडने केली सॅमची धुलाई –
व्हिडीओमध्ये असे दिसून येते की सॅम करन स्लोअर बॉलने ओव्हरची सुरुवात करतो, ज्यावर तो हेड लेग साइडच्या दिशेने चौकार मारतो. त्यानंतर पुढच्या चेंडूवर तो हेड ऑफ साइडवर चौकार मारतो. यानंतर, ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर, त्याने ‘हवाई फायर’ करत लेग साइडवर एक उत्तुंग षटकार मारला. मग पुढे सरसावत ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर पुन्हा षटकार मारला. यानंतर, पाचव्या चेंडूवर ऑफ साइडच्या दिशेला षटकार मारतो. यानंत सहाव्या चेंडूवर, त्याच दिशेने चौकार मारतो. अशा प्रकारे हेडने सॅम करनच्या एकाच षटकात ३० धावा कुटल्या.
१९ चेंडूत झळकावले अर्धशतक –
ट्रॅव्हिस हेड गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने आपल्या झंझावाती फलंदाजीने सर्वांना चकित केले आहे. शॉर्टसह त्याने पहिल्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. हेडने २३ चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ५९ धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याने अवघ्या १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. विशेष म्हणजे हेडने पहिल्या १२ चेंडूत केवळ १६ धावा केल्या होत्या. यानंतर त्याने १९ चेंडूंमध्ये म्हणजेच पुढच्या ७ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.
हेही वाचा – Kieron Pollard : रिटायरमेंट मागे घेऊन पोलार्ड मुंबई इंडियन्सकरता IPL 2025 मध्ये खेळताना दिसणार?
त्याचवेळी, शॉर्टने २६ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४१ धावांची खेळी केली. कर्णधार मिचेल मार्शने २ आणि जोश इंगलिसने २७ चेंडूत ३७ धावा केल्या. मार्कस स्टॉइनिस १० धावा केल्यानंतर, कॅमेरॉन ग्रीन १३ धावा केल्यानंतर, शॉन ॲबॉट चार धावा केल्यानंतर आणि ॲडम झाम्पा पाच धावा करून बाद झाले. तर टीम डेव्हिड आणि झेवियर बार्टलेट यांना खातेही उघडता आले नाही. इंग्लंडकडून लियाम लिव्हिंगस्टोनने तीन विकेट्स घेतल्या घेतले. त्याचवेळी जोफ्रा आर्चर आणि साकिब महमूद यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. सॅम करन आणि आदिल रशीद यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.