Australia vs Netherlands ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी विश्वचषक २०२३ चा २४ व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांच्यात आमनेसामने आहेत. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीतील दावेदार मजबूत करण्याचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर नेदरलँड्स या विश्वचषकात आणखी एक मोठा धक्का देण्याच्या निर्धाराने मैदानात उतररेल. हा सामना खूपच रोमांचक होऊ शकतो, कारण नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केले होता. तत्पूर्वी आजच्या सामन्याची नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कमिन्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. मार्कस स्टॉइनिस अनफिट आहे. त्याच्या जागी कॅमेरून ग्रीनने संघात प्रवेश केला आहे. त्याचवेळी नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स म्हणाला की, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. नाणेफेक जिंकली असती तर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता, असेही स्कॉट म्हणाला.

AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार

या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार विजयाची नोंद करणाऱ्या नेदरलँडविरुद्ध ऑस्ट्रेलियाला मात्र सावध राहावे लागणार आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयापासून प्रेरणा घेऊन नेदरलँडचा संघही स्पर्धेत आपली मोहीम जिवंत ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानविरुद्धची दमदार कामगिरी लक्षात घेता, त्यांच्यासाठी ते सोपे असणार नाही.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात नेदरलँड्सला कधीही यश आलेले नाही. २००३ आणि २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात कोणत्याही संघाविरुद्ध विजय मिळवण्याची क्षमता या संघाने दाखवून दिली. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करण्यासोबतच श्रीलंकेला कडवी टक्कर देण्यात हा संघ यशस्वी ठरला होता. संघाच्या गोलंदाजांनी छाप पाडली आहे, पण सलामीवीर विक्रमजीत सिंग आणि मॅक्स ओ’डॉड यांच्या फलंदाजी अजून कामी आलेली नाही.

हेही वाचा – Hardik Pandya Injury Update: इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी भारताला धक्का; हार्दिक पंड्याबाबत आली मोठी अपडेट!

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फॉर्मात असून वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्कसह फिरकीपटू अॅडम झाम्पाही चांगली कामगिरी करत आहेत. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांचे फॉर्ममध्ये पुनरागमन ही ऑस्ट्रेलियासाठी चांगली बातमी आहे. कारण ते त्यांच्या आक्रमक फलंदाजीने कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकतात. याचे उदाहरण म्हणजे त्यांची पाकिस्तानविरुद्धची २५९ धावांची भागीदारी.

नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा