बॉक्सिंग-डे कसोटीत चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला. ४५० धावांहून अधिकच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव २४० धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने त्यांचा २४७ धावांनी दारूण पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. न्यूझीलंडकडून सलामीवीर फलंदाज टॉम ब्लंडेलने सर्वाधिक १२१ धावा केल्या. पण त्याची झुंज तोकडी पडली.
Wisden T20 team of decade : टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंना संधी
Nathan Lyon and James Pattinson starred with the ball as Australia win the second #AUSvNZ Test by 247 runs at the MCG.
The hosts take an unassailable 2-0 lead.
REPORT https://t.co/fRPHZUOF3p
— ICC (@ICC) December 29, 2019
न्यूझीलंडचा दुसरा डाव गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाज नॅथन लायनने महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्याने चार बळी टिपले. पहिल्या डावात पाच बळी टिपणाऱ्या पॅट कमिन्सला मात्र दुसऱ्या डावात एकही बळी मिळाला नाही. तरीदेखील २०१९ या वर्षात एकूण ९९ बळी टिपत तो वर्षातील सर्वाधिक बळी टिपणारा गोलंदाज ठरला. त्याने यंदा कसोटी क्रिकेटमध्ये ५९, वनडेमध्ये ३१ आणि टी २० मध्ये ९ गडी बाद केले. या यादीत भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कसह ७७ बळींसह संयुक्तपणे दुसर्या स्थानावर आहे.
Team of Decade : पॉन्टिंगच्या कसोटी संघात चार कर्णधार, भारताचे ‘एवढे’ खेळाडू
कमिन्सच्या पराक्रमामुळे तो एका वर्षात सर्वाधिक बळी टिपणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. तसेच या यादीत त्याने वेगवान गोलंदाजांच्या यादीत चौथा क्रमांक पटकावला आहे. पॅट कमिन्सने कपिल देव, ग्लेन मॅकग्रा आणि मिचेल जॉन्सन यांच्या पंगतीत स्थान मिळवले आहे. कपिल देवने १९७९ मध्ये (७६ बळी), मॅकग्राने १९९९ मध्ये (११९ बळी) आणि जॉन्सनने २००९ मध्ये (११३ बळी) सर्वाधिक बळी टिपले होते. त्यानंतर आता पॅट कमिन्सने ९९ बळी मिळवत दिग्गजांच्या पंगतीत स्थान मिळवले आहे.
धोनीची टिंगल करणारा शोएब मलिक तुफान ट्रोल
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या IPL लिलावात कमिन्स हा IPL इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. कोलकाता नाइट रायडर्स संघाने त्याला लिलावात तब्बल १५ कोटी ५० लाखांच्या बोलीसह खरेदी केले.