दुबईच्या मैदानावर रंगलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ८ गड्यांनी धूळ चारत विश्वविजेतेपद मिळवले आहे. टी-२० प्रकारात प्रथमच ऑस्ट्रेलिया संघ विश्वविजेता ठरला. ऑस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केन विल्यमसनच्या वादळी ८५ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकात ४ बाद १७२ धावा केल्या. सुरुवातीला संथ खेळणाऱ्या न्यूझीलंडला विल्यमसनचा आधार मिळाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने कोणताही दबाव न घेता दमदार फलंदाजी केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श दमदार अर्धशतके ठोकली. १९व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलने चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाचे स्वप्न पूर्ण केले. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला, तर न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला. दोन्ही संघांचे उपांत्य फेरीचे सामने अतिशय रोमांचक ठरले होते. मिचेल मार्शला सामनावीर, तर डेव्हिड वॉर्नरला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
ऑस्ट्रेलियाचा डाव
डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी ऑस्ट्रेलियासाठी सुरुवात केली. तिसऱ्या षटकात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने फिंचला (५) माघारी धाडले. डॅरिल मिशेलने फिंचचा सुंदर झेल घेतला. फिंचनंतर मिचेल मार्शने ताबा घेतला. फिरकीपटू ईश सोधीने टाकलेल्या सातव्या षटकात ऑस्ट्रेलियाने अर्धशतक पूर्ण केले. यानंतर मार्श-वॉर्नर यांनी जोरदार फटकेबाजी केली. ११व्या षटकात वॉर्नरने नीशमला षटकार ठोकत आपले अर्धशतक फलकावर लावले. बोल्टने १३व्या षटकात गोलंदाजीला येत ही भागीदारी मोडली. त्याने वॉर्नरची दांडी गुल केली. वॉर्नरने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावा केल्या. वॉर्नरनंतर ग्लेन मॅक्सवेल मैदानात आला. वॉर्नर माघारी परतला असला तरी मार्शने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. १४व्या षटकात त्याने अर्धशतक पूर्ण केले. १९व्या षटकात ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मार्शने ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७७ धावा केल्या, तर मॅक्सवेल २८ धावांवर नाबाद राहिला.
हेही वाचा – एकच नंबर..! पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान सामना; विराटच्या अपमानाचा रोहित घेणार बदला!
न्यूझीलंडचा डाव
मार्टिन गप्टिल आणि डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडसाठी सलामी दिली. सेमीफायनलचा नायक ठरलेला मिशेल या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. चौथ्या षटकात वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने मिशेलला (११) यष्टीपाठी झेलबाद केले. मिशेलनंतर कप्तान केन विल्यमसन मैदानात आला. मिचेल मार्शने टाकलेल्या नवव्या षटकात न्यूझीलंडने अर्धशतक पूर्ण केले. यानंतर विल्यमसनने गप्टिलसह धावा जमवल्या. झम्पाने १२व्या षटकात गोलंदाजीला येत संथ खेळणाऱ्या गप्टिलला तंबूत पाठवले. गप्टिलने २८ धावा केल्या. त्याच्यानंतर ग्लेन फिलिप्ससह विल्यमसन स्थिरावला. पुढच्या षटकात त्याने आक्रमक पवित्रा धारण करत मॅक्सवेलला दोन षटकार खेचले. याच षटकात त्याने अर्धशतक पूर्ण केले. स्टार्कने १६वे षटक टाकले. या षटकात विल्यमसनने आक्रमक फटकेबाजी करत २२ धावा लुटल्या. १६ षटकात न्यूझीलंडने २ बाद १३६ धावा केल्या. फटकेबाजीमुळे विल्यमसन-फिलिप्स यांच्यात अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली. हेझलवूडने १८व्या षटकात फिलिप्स (१८) आणि विल्यमसनला (८५) माघारी धाडले. विल्यमसनने आपल्या खेळीत १० चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हात खोलू दिले नाहीत. २० षटकात न्यूझीलंडने ४ बाद १७२ धावा केल्या. नीशम १३ तर सेफर्ट ८ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियासाठी हेझलवूडने १६ धावांत ३ बळी घेतले.
१९व्या षटकात ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ऑस्ट्रेलियाला प्रथमच टी-२० वर्ल्डकप विजेतेपद मिळाले आहे.
१८ षटकात ऑस्ट्रेलियाने २ बाद १६२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला १२ चेंडूत ११ धावाची गरज आहे.
१७ षटकात ऑस्ट्रेलियाने २ बाद १५९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला १४ चेंडूत १८ धावाची गरज आहे.
१६ षटकात ऑस्ट्रेलियाने २ बाद १४९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला २४ चेंडूत २४ धावाची गरज आहे.
१५ षटकात ऑस्ट्रेलियाने २ बाद १३६ धावा केल्या.
वॉर्नर माघारी परतला असला तरी मार्शने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. १४व्या षटकात त्याने अर्धशतक पूर्ण केले. १४ षटकात ऑस्ट्रेलियाने २ बाद १२५ धावा केल्या.
बोल्टने १३व्या षटकात गोलंदाजीला येत ही भागीदारी मोडली. त्याने वॉर्नरची दांडी गुल केली. वॉर्नरने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावा केल्या. वॉर्नरनंतर ग्लेन मॅक्सवेल मैदानात आला आहे. १३ षटकात ऑस्ट्रेलियाने २ बाद १०९ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने १२व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. १२ षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद १०६ धावा केल्या.
११व्या षटकात वॉर्नरने नीशमला षटकार ठोकत आपले अर्धशतक फलकावर लावले. ११ षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद ९७ धावा केल्या.
१० षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद ८२ धावा केल्या. वॉर्नर ४५ तर मार्श ३० धावांवर नाबाद आहे.
नवव्या षटकात वॉर्नर-मार्शने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या षटकात दोघांनी सोधीला १७ धावा कुटल्या. नऊ षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद ७७ धावा केल्या.
आठ षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद ६० धावा केल्या.
फिरकीपटू ईश सोधीने टाकलेल्या सातव्या षटकात ऑस्ट्रेलियाने अर्धशतक पूर्ण केले. सात षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद ५० धावा केल्या.
सहा षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद ४३ धावा केल्या. मिल्नेने पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकले. या षटकात ऑस्ट्रेलियाला ३ धावा करता आल्या.
पाच षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद ४० धावा केल्या.
चौथ्या षटकात अॅडम मिल्नेने १५ धावा खर्च केल्या. चार षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद ३० धावा केल्या.
तिसऱ्या षटकात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने फिंचला (५) माघारी धाडले. डॅरिल मिशेलने फिंचचा सुंदर झेल घेतला. फिंचनंतर मिचेल मार्श मैदानात आला आहे. तीन षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद १५ धावा केल्या.
डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी ऑस्ट्रेलियासाठी सुरुवात केली. दुसऱ्या षटकात वॉर्नरने वेगवान गोलंदाज टिम साऊदीला दोन चौकार ठोकले. दोन षटकात ऑस्ट्रेलियाने बिनबाद ११ धावा केल्या.
शेवटच्या षटकात न्यूझीलंडला १० धावा करता आल्या. २० षटकात न्यूझीलंडने ४ बाद १७२ धावा केल्या. नीशम १३ तर सेफर्ट ८ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियासाठी हेझलवूडने १६ धावांत ३ बळी घेतले.
१९व्या षटकात नीशमने कमिन्सला एक षटकार ठोकला. १९ षटकात न्यूझीलंडने ४ बाद १६२ धावा केल्या.
१८व्या षटकात फिलिप्स (१८) आणि विल्यमसन (८५) झेलबाद झाला. हेझलवूडने दोघांना माघारी धाडले. जेम्स नीशम आणि टिम सेफर्ट मैदानात आहेत. १८ षटकात न्यूझीलंडने ४ बाद १४९ धावा केल्या.
१७ षटकात न्यूझीलंडने २ बाद १४४ धावा केल्या.
स्टार्कने १६वे षटक टाकले. या षटकात विल्यमसनने आक्रमक फटकेबाजी करत २२ धावा लुटल्या. १६ षटकात न्यूझीलंडने २ बाद १३६ धावा केल्या. फटकेबाजीमुळे विल्यमसन-फिलिप्स यांच्यात अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली. विल्यमसन ७७ तर फिलिप्स १५ धावावंर खेळत आहे.
१५ षटकात न्यूझीलंडने २ बाद ११४ धावा केल्या.
वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने टाकलेल्या १४व्या षटकात न्यूझीलंडचे शतक पूर्ण केले. १४ षटकात न्यूझीलंडने २ बाद १०० धावा केल्या.
१३व्या षटकात विल्यमसनने आक्रमक पवित्रा धारण करत मॅक्सवेलला दोन षटकार खेचले. याच षटकात त्याने अर्धशतक पूर्ण केले. १३ षटकात न्यूझीलंडने २ बाद ९७ धावा केल्या.
झम्पाने १२व्या षटकात गोलंदाजीला येत संथ खेळणाऱ्या गप्टिलला तंबूत पाठवले. गप्टिलने २८ धावा केल्या. त्याच्यानंतर ग्लेन फिलिप्स मैदानात आला आहे. १२ षटकात न्यूझीलंडने २ बाद ८१ धावा केल्या.
११व्या षटकात स्टार्कच्या गोलंदाजीवर हेझलवूडने विल्यमसनचा झेल सोडला. १९ धावांचे हे षटक ऑस्ट्रेलियासाठी महागडे ठरले. ११ षटकात न्यूझीलंडने १ बाद ७६ धावा केल्या.
१० षटकात न्यूझीलंडने १ बाद ५७ धावा केल्या. गप्टिल २७ तर विल्यमसन १८ धावांवर नाबाद आहे.
मिचेल मार्शने टाकलेल्या नवव्या षटकात न्यूझीलंडने अर्धशतक पूर्ण केले. विल्यमसनने या षटकात दोन चौकार ठोकले. नऊ षटकात न्यूझीलंडने १ बाद ५१ धावा केल्या.