दुबईच्या मैदानावर रंगलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ८ गड्यांनी धूळ चारत विश्वविजेतेपद मिळवले आहे. टी-२० प्रकारात प्रथमच ऑस्ट्रेलिया संघ विश्वविजेता ठरला. ऑस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केन विल्यमसनच्या वादळी ८५ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकात ४ बाद १७२ धावा केल्या. सुरुवातीला संथ खेळणाऱ्या न्यूझीलंडला विल्यमसनचा आधार मिळाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने कोणताही दबाव न घेता दमदार फलंदाजी केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श दमदार अर्धशतके ठोकली. १९व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलने चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाचे स्वप्न पूर्ण केले. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला, तर न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला. दोन्ही संघांचे उपांत्य फेरीचे सामने अतिशय रोमांचक ठरले होते. मिचेल मार्शला सामनावीर, तर डेव्हिड वॉर्नरला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ऑस्ट्रेलियाचा डाव
डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी ऑस्ट्रेलियासाठी सुरुवात केली. तिसऱ्या षटकात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने फिंचला (५) माघारी धाडले. डॅरिल मिशेलने फिंचचा सुंदर झेल घेतला. फिंचनंतर मिचेल मार्शने ताबा घेतला. फिरकीपटू ईश सोधीने टाकलेल्या सातव्या षटकात ऑस्ट्रेलियाने अर्धशतक पूर्ण केले. यानंतर मार्श-वॉर्नर यांनी जोरदार फटकेबाजी केली. ११व्या षटकात वॉर्नरने नीशमला षटकार ठोकत आपले अर्धशतक फलकावर लावले. बोल्टने १३व्या षटकात गोलंदाजीला येत ही भागीदारी मोडली. त्याने वॉर्नरची दांडी गुल केली. वॉर्नरने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावा केल्या. वॉर्नरनंतर ग्लेन मॅक्सवेल मैदानात आला. वॉर्नर माघारी परतला असला तरी मार्शने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. १४व्या षटकात त्याने अर्धशतक पूर्ण केले. १९व्या षटकात ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मार्शने ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७७ धावा केल्या, तर मॅक्सवेल २८ धावांवर नाबाद राहिला.
हेही वाचा – एकच नंबर..! पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान सामना; विराटच्या अपमानाचा रोहित घेणार बदला!
न्यूझीलंडचा डाव
मार्टिन गप्टिल आणि डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडसाठी सलामी दिली. सेमीफायनलचा नायक ठरलेला मिशेल या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. चौथ्या षटकात वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने मिशेलला (११) यष्टीपाठी झेलबाद केले. मिशेलनंतर कप्तान केन विल्यमसन मैदानात आला. मिचेल मार्शने टाकलेल्या नवव्या षटकात न्यूझीलंडने अर्धशतक पूर्ण केले. यानंतर विल्यमसनने गप्टिलसह धावा जमवल्या. झम्पाने १२व्या षटकात गोलंदाजीला येत संथ खेळणाऱ्या गप्टिलला तंबूत पाठवले. गप्टिलने २८ धावा केल्या. त्याच्यानंतर ग्लेन फिलिप्ससह विल्यमसन स्थिरावला. पुढच्या षटकात त्याने आक्रमक पवित्रा धारण करत मॅक्सवेलला दोन षटकार खेचले. याच षटकात त्याने अर्धशतक पूर्ण केले. स्टार्कने १६वे षटक टाकले. या षटकात विल्यमसनने आक्रमक फटकेबाजी करत २२ धावा लुटल्या. १६ षटकात न्यूझीलंडने २ बाद १३६ धावा केल्या. फटकेबाजीमुळे विल्यमसन-फिलिप्स यांच्यात अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली. हेझलवूडने १८व्या षटकात फिलिप्स (१८) आणि विल्यमसनला (८५) माघारी धाडले. विल्यमसनने आपल्या खेळीत १० चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हात खोलू दिले नाहीत. २० षटकात न्यूझीलंडने ४ बाद १७२ धावा केल्या. नीशम १३ तर सेफर्ट ८ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियासाठी हेझलवूडने १६ धावांत ३ बळी घेतले.
फिरकीपटू अॅडम झम्पाने आठवे षटक टाकले. त्याने या षटकात दोनच धावा दिल्या. आठ षटकात न्यूझीलंडने १ बाद ४० धावा केल्या.
सात षटकात न्यूझीलंडने १ बाद ३८ धावा केल्या.
सहा षटकांच्या पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंडने १ बाद ३२ धावा केल्या. सहाव्या षटकात न्यूझीलंडला २ धावा करता आल्या.
पाच षटकात न्यूझीलंडने १ बाद ३० धावा केल्या.
चौथ्या षटकात हेझलवूडने ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. त्याने मिशेलला (११) यष्टीपाठी झेलबाद केले. मिशेलनंतर कप्तान केन विल्यमसन मैदानात आला आहे. चार षटकात न्यूझीलंडने १ बाद २८ धावा केल्या.
Brilliant bowling from Hazlewood ?
— T20 World Cup (@T20WorldCup) November 14, 2021
His unerring accuracy gets him the wicket of Mitchell, who edges one to the keeper on 11. #T20WorldCup | #T20WorldCupFinal | #NZvAUS | https://t.co/1HyoPN4N0d pic.twitter.com/Z9ALHdJAXM
फिरकीपटू ग्लेन मॅक्सवेलने तिसरे षटक टाकले. या षटकात मिशेलने एक षटकार ठोकला. तीन षटकात न्यूझीलंडने बिनबाद २३ धावा केल्या.
दुसरे षटक जोश हेझलवूडने टाकले. या षटकातही गप्टिलने चौकार ठोकला. दोन षटकात न्यूझीलंडने बिनबाद १३ धावा केल्या.
दुसऱ्याच चेंडूवर गप्टीलने स्टार्कला खणखणीत चौकार ठोकला. पहिल्या षटकात न्यूझीलंडने बिनबाद ९ धावा केल्या.
न्यूझीलंडचे सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि डॅरिल मिशेल मैदानात. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियासाठी पहिले षटक टाकत आहे.
ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड.
न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट, ईश सोधी.
ऑस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Toss news from Dubai ?
— ICC (@ICC) November 14, 2021
Australia have won the toss and elected to field.
Which team is walking away with the ?? #T20WorldCup | #T20WorldCupFinal | #NZvAUS | https://t.co/50horpfG97 pic.twitter.com/euCvrMQ4IV
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांना जोडणाऱ्या टास्मन समुद्रामुळे उभय देशांतील नागरिकांना ‘ट्रान्स-टास्मन’ असे संबोधले जाते. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आज रंगणाऱ्या अंतिम फेरीत हेच ‘ट्रान्स-टास्मन’ संघ दुबईत सत्ता प्रस्थापित करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील.
संघासाठी आतापर्यंत सर्वाधिक २३६ धावा करणारा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि पाकिस्तानविरुद्ध सामन्याला कलाटणी देणारा मॅथ्यू वेड यांना मोक्याच्या क्षणी सूर गवसल्याने न्यूझीलंडला सावध राहावे लागेल. मात्र फिंच, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल या अनुभवी त्रिमूर्तीला अद्यापही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसवर अतिरिक्त दडपण येत आहे.
न्यूझीलंडला जागतिक कसोटी अजिंक्यपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा यष्टिरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉन्वे हाताच्या दुखापतीमुळे अंतिम लढतीला मुकणार आहे. कॉन्वेच्या माघारीमुळे सलामीवीर डॅरिल मिशेलवरील (१९७) जबाबदारी अधिक वाढली आहे. विल्यम्सन, गुप्टिल यांना कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे. अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यात पटाईत असलेला जिमी नीशम हुकुमी एक्का ठरू शकतो.
ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचला दहा हजार टी-२० धावा पूर्ण करण्यासाठी २५ धावांची गरज आहे. ही कामगिरी करणारा तो दुसरा ऑस्ट्रेलियन आणि एकूण सहावा खेळाडू ठरेल.
? ?????? ???? ?

Who are you backing?#T20WorldCup pic.twitter.com/XBiSz4RJ6K
टी-२० मधील रेकॉर्डची तुलना करता ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर वर्चस्व राखले आहे. टी-२० मध्ये दोन्ही संघ आतापर्यंत १४ वेळा आमने-सामने आले आहेत. यामधील नऊ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले असून पाच सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला होता. तर टी २० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकच सामना झाला आहे. हा सामना न्यूझीलंडने जिंकला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकत रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे.