AUS vs PAK 2nd Test Match: ऑस्ट्रेलियाने मेलबर्न येथे पाकिस्तानविरुद्धच्या बॉक्सिंग-डे कसोटीसाठी आपला १३ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेत्या संघाने रविवारी पर्थमध्ये ३६० धावांनी शानदार विजय नोंदविला. त्या विजयी संघात ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने फारसा बदल केलेला नाही. यावेळी १४ खेळाडूंचा संघ घोषित करण्याऐवजी ऑस्ट्रेलियाने एक खेळाडू कमी म्हणजे १३ खेळाडूंचा संघ निवडला आहे. अनकॅप्ड वेगवान गोलंदाज लान्स मॉरिसला देशांतर्गत स्पर्धेत खेळण्यासाठी करण्यासाठी संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा स्थितीत दुसऱ्या कसोटीतही मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि कर्णधार पॅट कमिन्स हे अनुभवी त्रिकूट वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचबरोबर स्कॉट बोलँडच्या रूपाने संघाकडे आणखी एक पर्याय त्यांच्याकडे आहे. ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने प्लेइंग-११ मध्ये बदल केल्यास स्टार्कला विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्याच्या जागी बोलंडचा संघात समावेश केला जाऊ शकते.

याशिवाय युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन हा आणखी एक खेळाडू आहे जो प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळविण्याच्या शर्यतीत आहे. मात्र, संघात गरज असेल तरच बदलांचा विचार करू, असा विश्वास कर्णधार पॅट कमिन्सने व्यक्त केला. तो म्हणाला, “मला वाटत नाही की दुखापत ही समस्या असेल. माझ्या माहितीनुसार पर्थमधील विजयानंतर सर्व गोलंदाज ताजेतवाने आहेत. उन्हाळ्याची ही चांगली सुरुवात आहे, आम्हाला आशा आहे की ही मालिका आम्हीचं जिंकू.”

हेही वाचा: AUS vs PAK: मायकेल वॉनने टीम इंडियाचे कौतुक करत पाकिस्तानला मारला टोमणा; म्हणाला, “ऑस्ट्रेलियात फक्त भारत…”

पहिल्या कसोटीनंतर ऑस्ट्रेलियासमोर एकमेव चिंतेचा विषय स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन हा होता. पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या खुर्रम शहजादचा चेंडू लाबुशेनच्या उजव्या हाताच्या बोटावर लागला. लाबुशेनने ताबडतोब वैद्यकीय उपचार घेतले परंतु काही मिनिटांनंतर तो फलंदाजीला परतला. २६ डिसेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तो वेळेत तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत झालेल्या बदलांबद्दल जर बोलायचे झाल्यास ऑस्ट्रेलिया सध्या ४१.६७ गुणांसह WTC क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान ६६.६७ टक्के गुणांसह भारतानंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

काय घडलं पहिल्या कसोटी सामान्यमध्ये?

जर सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ३६० धावांनी पराभव केला आहे. रविवारी कसोटीचा चौथा दिवस होता आणि कांगारूंनी चौथ्या दिवशीच पाकिस्तानचा पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानला ४५० धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, यानंतर पाकिस्तानचा संघ प्रत्युत्तरात ८९ धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात ४५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव २७१ धावांवर आटोपला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियन संघाला २१६ धावांची आघाडी मिळाली.

हेही वाचा: Ravi Shastri: रवी शास्त्रींनी किंग कोहलीबाबत केले सूचक विधान; म्हणाले, “विराटने कसोटी क्रिकेट हे…”

ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ५ बाद २३३ धावांवर घोषित केला. पहिल्या डावाच्या आधारे कांगारूंकडे २१६ धावांची आघाडी होती. अशा स्थितीत दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी ४४९ धावांची झाली. कांगारूंनी पाकिस्तानला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात स्वतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फायदा त्यांना मिळाला. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात स्टार्क आणि हेझलवूडने भेदक गोलंदाजी केली. त्यांनी प्रत्येकी तीन फलंदाज बाद केले, तर नॅथन लियॉनने दोन गडी बाद केले.

दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मिच स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aus vs pak australia announce squad for boxing day test eight days early this fast bowler left out avw
Show comments